फक्त मुद्द्याचं!

1st May 2026
गुन्हेगारी

बनावट कंपन्यांची कागदपत्रे दाखवून साडेबावीस लाखांची फसवणूक; आरोपी अटकेत

बनावट कंपन्यांची कागदपत्रे दाखवून साडेबावीस लाखांची फसवणूक; आरोपी अटकेत

पिंपरी : बनावट कागदपत्रे दाखवून आमच्या कुटुंबाच्या तीन कंपन्या आहेत असे भासवून आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास रकमेच्या दुप्पट रक्कम दहा दिवसात परत केली जाईल असे आमीष दाखवून एका व्यक्तीची 22 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना 6 फेब्रुवारी ते 7 एप्रिल 2026 या कालावधीत टाईप 3/1, आयकर कर्मचारी निवास, सेक्टर नंबर 26, प्राधिकरण निगडी येथे घडली.

vcc maharastra din
vcc maharastra din

याबाबत एका महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुणाल काशिनाथ साबळे (वय 36, फ्लॅट नंबर सहा, योगीराज आपार्टमेंट, मधुबन सोसायटी, जुनी सांगवी, औंध कॅम्प) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने बनावट कागदपत्रे दाखवून त्याच्या कुटुंबीयांच्या तीन कंपन्या असल्याचे फिर्यादीस भासवले. आरोपीच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास दहा दिवसात दुप्पट रक्कम माघारी देण्याचे अमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीने वेळोवेळी आरोपी यांच्या बँक खात्यात एकूण 22 लाख 50 हजार रुपये ट्रान्सफर केले. गुंतवणूक केलेल्या रकमेच्या फायद्यापोटी आरोपीने फिर्यादीस पंचवीस लाख रुपयांचा बँक धनादेश दिला होता. फिर्यादी यांनी रक्कम आरोपीच्या खात्यात ट्रान्सफर केल्यानंतर दहा दिवसानंतर आरोपी कुणाल साबळे यास गुंतवणूक केलेली रक्कम व फायद्याची रक्कम माघारी मागितली. त्यांनी रक्कम माघारी दिली नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीने दिलेला 25 लाखाचा धनादेश आरोपीच्या बँक खात्यात भरला. परंतु आरोपीच्या बँक खात्यात रक्कम नसल्यामुळे धनादेश बाउंस झाला. अशाप्रकारे आरोपीने 22 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिर्के हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"