Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
गुन्हेगारी

लेबर कॅम्प मधील कामगारांमध्ये झालेल्या मारामारीत दोघांचा मृत्यू!

लेबर कॅम्प मधील कामगारांमध्ये झालेल्या मारामारीत दोघांचा मृत्यू!

पिंपरी : कंपनीच्या लेबर कॅम्प मधील पत्र्याच्या शेडमध्ये दोन कामगारांमध्ये वाद झाल्याने एका कामगाराने लाकडी पाटाने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केले. यातच त्याचा मृत्यू झाला. तर आरोपी कामगार याचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना युनिटी बिल्ड टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या लेबर कॅम्प मध्ये मौजे शिंदे गावचे हद्दीत तालुका खेड येथे घडली.

याप्रकरणी रवींद्र विलास पवार (वय 43, रा वडमुखवाडी, चरोली, भोसरी )यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .अमरूप उरनो (वय 40, रा. महाकालगुरी ,समुकताला, जि. जाल्पैगुरी, पश्चिम बंगाल) असे आरोपीचे नाव असून उपचारादरम्यान त्याचा देखील मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गावचे हद्दीत युनिटी बिल टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या लेबर कॅम्प मध्ये पत्र्याच्या खोलीत चिरंजीत बासुमातो (वय 37 ,रा. अलिपुराधूर, जि. जालपैगुरी ,पश्चिम बंगाल) व आरोपी अमरुप उराणू यांच्यात कोणत्यातरी कारणावरून वाद होऊन आरोपी याने मयत यास त्याच्या खोलीमधील लाकडी पाट डोक्यात मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले .तसेच आरोपी व मयत यांच्यात मारामारी होऊन आरोपी देखील गंभीर जखमी झाला होता. आरोपीवर उपचार सुरू असताना त्याचा देखील मृत्यू झाला आहे. उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ढोले हे अधिक तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

अल्युमिनियम प्लेट चोरी प्रकरणी दोघांना अटक!
पिंपरी : रावेत तेथील स्काय एलिगन्स या साईट वरून अल्युमिनियमच्या 15 प्लेट चोरून नेल्याने दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना 25 ते 28 जुलै या कालावधीत स्काय एलिगन साईड एस बी पाटील रोड, लक्ष्मी नगर, रावेत येथे घडली.

याप्रकरणी सचिन नानाभाऊ देवकर (वय 32, फ्लॅट नंबर 302 ,मंगल आपार्टमेंट, चंद्रभागा कॉर्नर ,रावेत) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रेम राकेश वाल्मिकी (वय 21), स्वप्निल शंकर कुडवे (वय 24, दोघेही रा. पत्रा शेड झोपडपट्टी, लिंक रोड, चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी काम करत असलेल्या स्काय एलिगन्स साईट वरून 75 हजार रुपये किंमतीच्या 15 अल्युमिनियम प्लेट्स चोरी झाल्या. रावेत पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"