Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

27th October 2026
गुन्हेगारी

पिंपरी रिक्षा स्टँडवर दोघांवर बर्फ फोडण्याच्या टोच्याने हल्ला!

पिंपरी रिक्षा स्टँडवर दोघांवर बर्फ फोडण्याच्या टोच्याने हल्ला!

पिंपरी : येथे रिक्षा स्टँडवर गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर बर्फ फोडण्याच्या टोचाने हल्ला करण्यात आला. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या मित्राच्या छातीतही टोच्या भोसकण्यात आला. ही घटना सोमवार 12 ऑक्टोबर रोजी दुपारी आंबेडकर चौकात घडली.

विशाल उर्फ अण्णा दिलीप धोत्रे (वय 38,निगडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .अदनान शरीफ कुरेशी (वय 25) आणि मुस्तफा उर्फ मुसा शरीफ कुरेशी (वय 22, दोघेही रा. खडकी बाजार, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

vcc navratri
vcc navratri

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या वादाचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला. विशाल आणि त्याचा मित्र कैलास म्हेत्रे हे आंबेडकर चौकातील रिक्षा स्टॅडवर गप्पा मारत उभे होते. त्यावेळी मुसा कुरेशी याने विशाल याला ‘माझ्या भावाला त्रास का देतोस’ अशी विचारणा करीत चापट मारली. त्यानंतर त्याने बर्फ फोडण्याचा टोचा काढून विशाल यांच्यावर वार केला. हा वार त्याच्या कानाजवळून घासून गेला. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या कैलास म्हेत्रे यांच्या छातीत टोचा भोसकून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

‘भाई’ असल्याची धमकी देऊन उकळली खंडणी !
पिंपरी : ‘भाई’ असल्याची धमकी देत पानटपरी चालकाकडे दरमहा दहा हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडून 1700 रुपये उकळण्यात आले. ही घटना 12 ते 22 सप्टेंबर दरम्यान थेरगाव येथे घडली.

राहुल कारभारी चव्हाण (वय 34, रा. चिंचवड) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भाऊसाहेब हरी दगडे (वय 40, रा. थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल यांची थेरगाव येथील धनगर बाबा मंदिराजवळ मल्हार पान शॉप नावाची टपरी आहे. आरोपीने तेथे जाऊन मी इथला ‘भाई’ आहे. मला महिन्याला दहा हजारांचा हप्ता सुरू कर, नाहीतर तुला जीवे मारीन अशी धमकी दिली. त्यानंतर रोख स्वरूपात आणि फोन पे वरून 1700 रुपये जबरदस्तीने घेतले. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"