Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

25th October 2026
गुन्हेगारी

तळवडे येथे जेष्ठ महिलेचे हातपाय बांधून 53 लाख 70 हजार रुपयांचा घातला दरोडा!

तळवडे येथे जेष्ठ महिलेचे हातपाय बांधून 53 लाख 70 हजार रुपयांचा घातला दरोडा!

68 तोळे, पाच लाखाची रोकड चोरट्यांनी लुटली
पिंपरी : घरात एकट्या झोपलेल्या ज्येष्ठ महिलेचे हातपाय बांधून, मारहाण करत चाकूचा धाक दाखवून तीन चोरट्यांनी 53 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. ही घटना मंगळवार 13 ऑक्टोबर मध्यरात्री साडेबारा ते पाहाटे सव्वादोनच्या दरम्यान तळवडे येथील ज्योतिबानगर परिसरात घडली.

vcc navratri
vcc navratri

भारती मारुती भालेकर (वय 60, रा. तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तीन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भालेकर कुटुंबाने स्वतःच्या मालकीची जागा एका कंपनीला तसेच काही खोल्या भाड्याने दिल्या आहेत. भारती भालेकर या घराच्या पहिल्या मजल्यावर एकट्या राहतात. तर त्यांचा मुलगा आणि सून तळमजल्यावर राहतात. सोमवारी रात्री त्या हॉलचा दरवाजा बंद करून बेडरूम मध्ये झोपल्या होत्या. त्यांच्या घराच्या मागील बाजूस सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणावरून चोरट्यांनी टेरेसवरून घरात प्रवेश केल्याचे समोर आले आहे. मध्यरात्री चोरट्यांनी हॉलचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

ज्येष्ठ महिला त्यांचे हातपाय बांधले, तोंडावर साड्या टाकून त्यांना मारहाण केली. तसेच चाकूचा धाक दाखवला. घरातील 48 लाख 25 हजार रुपये किंमतीचे 68 तोळे सोन्याचे दागिने, पाच लाख रुपयांची रोकड, तीस हजारांचे चांदीचे दागिने, दहा हजाराचा मोबाईल आणि पाच हजाराचे घड्याळ असा एकूण 53 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांनी घटनेची माहिती घेतली असून चिखली पोलीस तपास करत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"