Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

3rd October 2026
पिंपरी-चिंचवड

गणेशोत्सव जगभरात पोहोचविण्यासाठी घरगुती व सार्वजनिक फोटो,व्हिडिओ अपलोड करावेत!

गणेशोत्सव जगभरात पोहोचविण्यासाठी घरगुती व सार्वजनिक फोटो,व्हिडिओ अपलोड करावेत!

गणेशोत्सवाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी नागरिकांनी ॲपद्वारे व्यापक सहभाग नोंदवावा – नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांचे आवाहन
पिंपरी : महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक अस्मिता असलेल्या गणेशोत्सवाला राज्य शासनाने ‘राज्य महोत्सव’ म्हणून दर्जा दिला आहे. महाराष्ट्राच्या या गौरवशाली परंपरेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला युनेस्कोचा वारसा दर्जा व अन्य जागतिक मानांकने प्राप्त करून देण्यासाठी राज्य शासनामार्फत व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन जनता संपर्क अधिकारी तथा नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले आहे.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक, गणेश मंडळे, संस्था, कलाकार, सांस्कृतिक संस्था, शैक्षणिक संस्था तसेच विविध सामाजिक घटकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या गणेशोत्सवाशी संबंधित परंपरा, कला, छायाचित्रे, व्हिडिओ आणि आठवणींचे दस्तऐवजीकरण Bappa.org या वेबसाईटवर मराठी,हिंदी,इंग्रजीसह विविध सोईस्कर भाषेत upload करावे तसेच महाराष्ट्राच्या समृद्ध गणेशपरंपरेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले आहे.

indra dairy
indra dairy

या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशाने जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात गणेशोत्सवाच्या अनुषंगाने प्रसिद्धीविषयक उपक्रम राबविणे, त्यांचा समन्वय साधणे तसेच शासन निर्देशानुसार आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी नोडल अधिकारी पुराणिक यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

गणेशोत्सव हा महाराष्ट्राचे केवळ सांस्कृतिक वैभव नसून अध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक तसेच उद्यमशीलतेला चालना देणारी व्यापक लोकचळवळ आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी केवळ मर्यादित शासकीय कार्यक्रम किंवा उत्सवी सप्ताहापुरते प्रयत्न मर्यादित न ठेवता, राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध माध्यमांतून सातत्यपूर्ण उपक्रम राबविणे आवश्यक आहे, असे पुराणिक यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे जागतिक संस्थांसाठी दस्तऐवजीकरण करण्याबरोबरच या उत्सवाशी संबंधित परंपरा, कला, चालीरीती आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील पुरातत्त्व संचालनालयामार्फत Bappa.org हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

शहरातील गणेशोत्सवाचा सांस्कृतिक वारसा अधिकृत व कायमस्वरूपी जतन होणार
या अधिकृत मंचावर महाराष्ट्रासह देशभरातील तसेच ३५ हून अधिक जागतिक शहरांमधील गणेशोत्सवाशी संबंधित घरगुती व सार्वजनिक परंपरा, गणेशमूर्ती स्थापना, सजावट, हस्तकला, चालीरीती, कला सादरीकरण, खाद्यपरंपरा, आठवणी, छायाचित्रे आणि व्हिडिओ नागरिकांना WhatsApp च्या माध्यमातून Bappa.org यावेबसाईटवर नोंदविता व अपलोड करता येणार आहेत. नागरिकांच्या सहभागातून तयार होणारा हा महाराष्ट्राच्या गणेशपरंपरेचा अधिकृत व कायमस्वरूपी सांस्कृतिक दस्तऐवज ठरणार आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"