डिजिटल अरेस्टची धमकी; ज्येष्ठ महिलेची 76 लाख 22 हजार रुपयांची केली फसवणूक!

पिंपरी : व्हाट्सअपवरून कॉल करून एका महिलेस पोलीस अधिकारी असल्याचे भासवून सुप्रीम कोर्टाचे बनावट अरेस्ट वॉरंट, वेगवेगळे नोटीस, सरकारी दस्तऐवज कागदपत्रे तयार करून निवासस्थानी चुकीच्या पद्धतीने अटकाव करून बंदिस्त ठेवले. याशिवाय महिलेस सर्व रक्कम शासनास जमा करावी लागेल व व्हेरीफाय झाल्यानंतर परत मिळेल असे खोटे सांगून वेगवेगळ्या बँक अकाउंट वर 76 लाख 22 हजार 541 इतकी रक्कम भरण्यास भाग पाडून फसवणूक केली. ही घटना 2 ते 9 सप्टेंबर या दरम्यान फिर्यादी यांच्या राहते निवासस्थानी ऑनलाइन स्वरूपात घडली.

या प्रकरणी जेष्ठ महिलेने (वय 68,सदनिका क्रमांक A- 303, सिल्वर सिटी, वडाचा मळा, जाधववाडी, चिखली) यांनी सायबर शाखेकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार व्हाट्सअप नंबर धारक, वापर करता, विविध बँकांचे अकाउंट होल्डर, सदर प्रकार आणि षडयंत्र असणारे साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांनी व्हाट्सअप वरून कॉल करून पोलीस अधिकारी असल्याचे भासून फिर्यादी यांच्या आधार कार्ड वरून सिम कार्ड काढण्यात आले. सदर सिम कार्ड वर गैरप्रकार, दहशतवादी संघटना, मनी लॉन्ड्रीग, आणि फौजदारीयुक्त गुन्हे दाखल असल्याचे व त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे बनावट अरेस्ट वॉरंट, वेगवेगळे नोटीस, सरकारी दस्तऐवज कागदपत्रे तयार करून व खरे असल्याचे भासवून फिर्यादीस धमकी दिली. डिजिटल स्वरूपात फिर्यादी यांना निवासस्थानी चुकीच्या पद्धतीने अटकाव करून बंदिस्त ठेवले. फिर्यादी यांना त्यांच्याकडील सर्व रक्कम शासनास जमा करावी लागेल व ती व्हेरिफाय झाल्यानंतर परत मिळेल असे खोटे सांगून वेगवेगळ्या बँक अकाउंट वर एकूण 76 लाख 22 हजार 541 इतकी रक्कम भरण्यास भाग पाडले. बनावट शासकीय पावत्या दाखवून फिर्यादीची फसवणूक केली. सायबर शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोपळे, पोलीस निरीक्षक गायकवाड हे तपास करत आहेत.
“पोलीस आयुक्त भेट” (CP MEET) उपक्रम अनंत चतुर्दशीमुळे रद्द !
पिंपरी छ पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, अनंत चतुर्दशीच्या अनुषंगाने आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पोलीस बंदोबस्त आहे. त्यामुळे दर शुक्रवारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे आयोजित करण्यात येणारा “पोलीस आयुक्त भेट” (CP MEET) हा उपक्रम शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी रद्द करण्यात आलेला आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी. असे आवाहन पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
पुढील “पोलीस आयुक्त भेट” (CP MEET) उपक्रम नियमित वेळापत्रकानुसार शुक्रवारी आयोजित करण्यात येईल.

