तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना घेतले ताब्यात!

पिंपरी : पैसे लावून विनापरवाना तीन पत्ती नावाचा जुगार खेळत असताना रोख रक्कम तीन दिवसाची मोटरसायकल एक रिक्षा व सहा मोबाईल असा एकूण चार लाख दहा हजार एकशे तीस रुपये व पत्त्यांचे पानासह मिळून आल्याने नऊ जणांना ताब्यात ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई रविवार 20 सप्टेंबर रोजी दुपारी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास दावत किराणा स्टोअर च्या समोर पिंपळाच्या झाडाखाली रमाबाई नगर कमानी शेजारी लिंक रोड पिंपरी येथे करण्यात आली .
याप्रकरणी उद्धव बद्रीनाथ खेडकर पोलीस शिपाई गुन्हे शाखा युनिट एक यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बसवराज लक्ष्मण सोनकांबळे (वय 61, रमाबाई नगर झोपडपट्टी, पिंपरी), हिरालाल सकपाल चव्हाण (वय 68, रा. सेनटरची चाळ शेवाळे सेंटर समोर झोपडपट्टी, पिंपरी), अशोक अभिमान गायकवाड (वय 65, रा. पाणी फिल्टर चे शेजारी पत्रा शेड, लिंक रोड, चिंचवड), विजय जॉन लोंढे (वय 60, रा. रमाबाई नगर झोपडपट्टी, पिंपरी), अशोक सुरेश बनसोडे (वय 42, पाणी फिल्टरचे शेजारी पत्रा शेड लिंक रोड, चिंचवड), विजय परमेश्वर पांडागळे (वय 30, पाणी फिल्टरचे शेजारी पत्रा शेड, लिंक रोड, चिंचवड), सतीश संभाजी दुशिंग (वय 65, त्रिमूर्ती बिल्डिंग, घरकुल चिखली), दादू धनाजी भोसले (वय 70, रमाबाई नगर झोपडपट्टी ,पिंपरी), विशाल शेट्टप्पा कांबळे (वय 40 रमाबाई नगर झोपडपट्टी, पिंपरी )असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक ते नऊ यांनी स्वतःच्या फायद्या करता पैसे लावून विनापरवाना तीन पत्ती नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना ही कारवाई करण्यात आली पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे हे तपास करत आहेत.

अल्पवयीन मुलाकडून एक पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
पिंपरी : अल्पवयीन मुलाने विनापरवाना बेकायदेशीररित्या एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस असा एकूण 51 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जवळ बाळगून प्रतिबंधित शस्त्र जवळ बाळगण्याच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई सोमवार 21 सप्टेंबर रोजी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मौजे मेदनकरवाडी, ता. खेड तेथे करण्यात आली.
याप्रकरणी नितीन ज्ञानेश्वर गुंजाळ पोलीस शिपाई गुन्हे शाखा युनिट तीन यांनी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .अल्पवयीन बालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगा याने आपल्याजवळ विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतुस असा एकूण 51 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जवळ बाळगला ..पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये घातक शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध असताना अल्पवयीन मुलाने आपल्याजवळ पिस्तूल बाळगून या आदेशाचा भंग केला आहे हे शस्त्र त्याने सुरजीत सिंग (रा. मध्य प्रदेश ) याचे कडून खरेदी केले असल्याचे सांगितले. दक्षिण चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोते हे तपास करत आहेत.
तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना घेतले ताब्यात!पिंपरी : पैसे लावून विनापरवाना तीन पत्ती नावाचा जुगार खेळत असताना रोख रक्कम तीन दिवसाची मोटरसायकल एक रिक्षा व सहा मोबाईल असा एकूण चार लाख दहा हजार एकशे तीस रुपये व पत्त्यांचे पानासह मिळून आल्याने नऊ जणांना ताब्यात ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई रविवार 20 सप्टेंबर रोजी दुपारी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास दावत किराणा स्टोअर च्या समोर पिंपळाच्या झाडाखाली रमाबाई नगर कमानी शेजारी लिंक रोड पिंपरी येथे करण्यात आली .