बारावी परीक्षेचा राज्याचा एकूण निकाल 91.87%;कोकण विभाग अव्वल!

पुणे विभाग दुसऱ्या क्रमांकावर
पुणे : बारावी परीक्षेचा राज्याचा एकूण निकाल 91.87% लागला असून पुणे विभागाचा निकाल 93.34% लागला आहे. राज्यात पुणे विभागाला दुसरा क्रमांक मिळाला आहे. कोकण विभागाने यावर्षी देखील बाजी मारली आहे. बारावी परीक्षेच्या निकालात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलींनी बाजी मारली आहे .मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 94.73% आहे, तर मुलांचे प्रमाण 89.14% आहे. सर्व नऊ विभागीय मंडळामध्ये कोकण विभाग 97.51% निकालासह प्रथम क्रमांकावर असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे.

नऊ विभागीय मंडळाचा निकाल
पुणे 91.25 टक्के ,नागपूर 88.67 टक्के, छत्रपती संभाजीनगर 88.68 टक्के, कोल्हापूर 89.97 टक्के ,अमरावती 90.92 टक्के ,नाशिक 90.72 टक्के, लातूर 84.14 टक्के, कोकण विभाग 94.14 टक्के, मुंबई 90. 08 टक्के
शाखा निहाय निकाल
विज्ञान शाखा ; 96 44%,
वाणिज्य शाखा; 92 71 टक्के,
कला शाखा ; ८६.४५ टक्के,
व्यावसायिक अभ्यासक्रम ; 87. 75 टक्के

