“दिवेकर प्रीमियर लीग २०२६ला” प्रारंभ;मुंबई इंडियन्स १० धावांनी विजयी!

सामन्याचा सामनावीर प्रयोज गायकवाड (103 धावा)
पिंपरी : दिवेकर अकॅडमीच्या माध्यमातून उत्तमोत्तम खेळाडू घडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात व त्याचे प्रतिबिंब आज महाराष्ट्रातील प्रत्येक संघात दिसत आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र रणजी ट्रॉफी खेळाडू ओम भोसले यांनी केले. “दिवेकर प्रीमियर लीग स्पर्धेचे उद्दघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. ५० षटकांच्या या स्पर्धेत एमआय, आरसीबी, सीएसके,जीटी व डीसी ५ संघाचा समावेश

चंद्रकांत भोंडवे, शरद भोंडवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन केले.. यावेळी पाहुण्यांचे स्वागत सुनील दिवेकर,मुकेश गुजराथी,नरेंद्र कदम व सौ सुप्रियाताई दिवेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी सुनील दिवेकर म्हणाले की खेळाडूंची दीर्घ खेळण्याची क्षमता, विकेटवर दीर्घ काळ टिकण्याची मानसिकता, वाढविण्याची दृष्टिकोनातून ही स्पर्धा घेण्याचे ठरवले आहे.
याप्रसंगी दिवेकर क्रिकेट अकॅडमीचे संचालक व हेड कोच सुनील दिवेकर, संचालिका सौ सुप्रियाताई दिवेकर ,मुकेश गुजराथी,औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम,खजिनदार प्रदीप वाघ,क्रीडाप्रेमी शरद भोंडवे,चंद्रकांत भोंडवे,अंकुश ठाकूर पाटील व खेळाडूंचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजच्या सामन्याचा निकाल खालील प्रमाणे
मुंबई इंडियन्स १० धावांनी विजयी
मुंबई इंडियन्स ४१.५ षटके सर्व बाद ३३५ धावा :-प्रयोज गायकवाड १०३ (त्याने १८ चौकार व १ षटकारांच्या साह्याने शतक झळकाविले.)महेश साळुंखे ४२ आतिश कोळेकर १९ तनवी खळदकर २२
श्रावण मुरूमकर ३२/२ शिवेंद्र शिंदे ३८/२ सोहम तायडे ५५/२ अर्चित कुलकर्णी १६/२
चेन्नई सुपर किंग्स ४३.४ षटके सर्व बाद ३२५ धावा:- अवनीश हनुमंते ३३ अर्चित कुलकर्णी २६ शिवेंद्र शिंदे १४३ (शिवेंद्र शिंदेने ७ षटकार २१ चौकाराच्या साह्याने शतक झळकाविले) अर्णव गावडे ४१ श्लोक सूर्यवंशी २६/२ ऋग्वेद एरंडे २२/२ आतिश कोळेकर ३९/२.या सामन्याचा सामनावीर मुंबई इंडियन्सचा प्रयोज गायकवाड ठरला.

