फक्त मुद्द्याचं!

2nd May 2026
महाराष्ट्र

नसरापूर पाठोपाठ चाकण मध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार व हत्येची दुसरी घटना!

नसरापूर पाठोपाठ चाकण मध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार व हत्येची दुसरी घटना!

खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
चाकण : भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवार एक मे रोजी घडली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातीलच चाकण मध्ये धक्कादायक घटना घडली आहे. तीन वर्षाच्या अल्पवयीन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे

vcc maharastra din
vcc maharastra din

मिळालेल्या माहितीनुसार चाकण मध्ये मूळचा बिहार राज्यातील असलेल्या एका सोळा वर्षे अल्पवयीन तरुणाने हे कृत्य केले आहे. याप्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मृत चिमुकल्यांचे कुटुंब हे मध्यप्रदेश मधील असून कामानिमित्त चाकण परिसरात वास्तव्यास आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

भोरमधील नसरापूर येथील चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला संपवल्याची घटना घडली आहे. नसरापूर गावात चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर आज शनिवार (2 मे )रोजी गावात कडकडीत बंद पुकारण्यात आला. या नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या आरोपीवर यापूर्वी देखील लैंगिक अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावरून पोलिस व गावकरी यांच्यात वादावादी देखील झाली आहे. या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केली आणि तिचा मृतदेह शेणाच्या ढिगार्‍याखाली दाबून ठेवण्यात आला.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. माजी आमदार संग्राम थोपटे , आमदार शंकर मांडेकर यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले की तातडीने आरोपीवर कारवाई केली जाईल. पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी सांगितले की पॉक्सो कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. तातडीने दोषारोप पत्र दाखल करून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी म्हणून आम्ही आग्रही आहे .यापूर्वी आरोपीवर 1998 2015 साली गुन्हा दाखल झालेला आहे मात्र त्यातून तो मुक्त झाला आहे असे गिल यांनी सांगितले .

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नसरापुर मध्ये हत्या झालेल्या मुलीच्या घरी सांत्वन पर भेट दिली. यावेळी या मुलीचे कुटुंबीय आणि आजूबाजूच्या लोकांनी आरोपीच्या विरोधात लवकरात लवकर खटला चालवून त्याला शिक्षा करण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नागरिकांच्या समोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून जमावाच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन दिले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"