फक्त मुद्द्याचं!

2nd May 2026
गुन्हेगारी

आदेशाचा भंग करून पिस्टल जवळ बाळगले; एकास अटक

आदेशाचा भंग करून पिस्टल जवळ बाळगले; एकास अटक

आळंदी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत कोणतेही घातक शस्त्र जवळ बाळगण्यास प्रतिबंध असताना एका व्यक्तीने 46 हजार रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस बेकायदेशीररित्या जवळ बाळगल्याने पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवार 30 एप्रिल रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास आळंदी, ता. खेड, इंद्रायणी नदी घाटावर करण्यात आली .

vcc maharastra din
vcc maharastra din

याबाबत बाळासाहेब विष्णू खेडकर पोलीस शिपाई, आळंदी पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दाखल केली आहे. तानाजी माणिक शिंदे (वय 28, इंद्रायणी घाट आळंदी, ता. खेड मूळ रा.- वसंत विद्यालय कानडी रोड, केज, ता. केज, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घातक शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध असताना आदेशाचा भंग करून आरोपी यांनी 46000 किंमतीचे देशी बनावटी पिस्टल व एक जिवंत काडतुस हे घातक शस्त्र बेकायदेशीररित्या जवळ बाळगले. आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार दोडके हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"