रुग्ण महिलेचा विनयभंग; डॉक्टर जेरबंद!

पिंपरी : खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी चिंचवड मधील एका डॉक्टरला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवार 14 जून रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास संभाजीनगर चिंचवड येथील चेतना हॉस्पिटलमध्ये घडली.

याप्रकरणी एका 37 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .डॉक्टर धैर्यशील शेटक (वय 27, रा. संभाजीनगर, चिंचवड ,मूळ- रा. कोल्हापूर) यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या संबंधित कलमाने गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला काही दिवसापासून उपचारासाठी संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांच्यावर महिला वार्डमध्ये उपचार सुरू होते. रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास आरोपी डॉक्टर वार्ड मध्ये आला. उपचाराचा भाग असल्याचे भासवत त्याने महिलेच्या पायाला लावलेले स्टॉकिंग नीट करण्याचे कारण सांगितले. त्याने महिलेच्या मांडीला तसेच खाजगी भागाला स्पर्श केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित महिलेने घडलेला प्रकार आपल्या नातेवाईकांच्या निदर्शनास आणून दिला. नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली. त्यानंतर महिलेने निगडी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. तक्रारीची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून प्राथमिक चौकशीनंतर आरोपी डॉक्टरला अटक केली. रुग्ण महिलेचा विनयभंग डॉक्टर जे

