फक्त मुद्द्याचं!

9th May 2026
पिंपरी-चिंचवड

उद्यानात उभारण्यात येणारे विरंगुळा केंद्र सामाजिक संवादासाठी व्यासपीठ : महापौर रवि लांडगे

उद्यानात उभारण्यात येणारे विरंगुळा केंद्र सामाजिक संवादासाठी व्यासपीठ : महापौर रवि लांडगे

मोरवाडी येथील देऊबाई कापसे उद्यानात बहुउद्देशीय विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील उद्याने ही शहराचा श्वास आहेत. इतर शहरांच्या तुलनेत आपल्या शहरात अधिक उद्याने असून, त्यांचे संगोपन आणि संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. उद्यानांमध्ये उभारण्यात येणाऱ्या विरंगुळा केंद्राच्या माध्यमातून सर्व वयोगटातील नागरिकांना एकत्र येण्यासाठी, व्यायाम, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक संवादासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी येथील देऊबाई कापसे उद्यान परिसरात बहुउद्देशीय दोन मजली विरंगुळा केंद्राच्या कामाचे भूमिपूजन आज महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसदस्य कुशाग्र कदम, तुषार हिंगे, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून शहरातील उद्यानांचे आधुनिकीकरण आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यावर विशेष भर दिला जात आहे. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कापसे उद्यानात उभारण्यात येणाऱ्या दोन मजली विरंगुळा केंद्रासाठी ६ लाख ५३ हजार रुपये खर्च येणार असून या कामाची मुदत ८ महिन्यांची आहे.विरंगुळा केंद्र १८ मीटर बाय ८ मीटर असे एकूण २८८ चौरस मीटर परिसरात असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"