फक्त मुद्द्याचं!

9th May 2026
गुन्हेगारी

ज्येष्ठ नागरिक महिलेचा गळा दाबून खून : आरोपी अटकेत

ज्येष्ठ नागरिक महिलेचा गळा दाबून खून : आरोपी अटकेत

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
पिंपरी :ज्येष्ठ नागरिक असलेल्या 80 वर्षीय महिलेच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने काढून महिलेचा गळा दाबून खून केला. व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने महिलेचे प्रेत प्लास्टिक गोणी मध्ये घालून भामा नदीच्या पात्रात टाकले. ही घटना दोन मे 2026 रोजी रात्री आठ वाजण्याचे सुमारास मौजे करंजविहारे ता. खेड, मरगज वस्ती येथे घडली. सिंधुताई विठोबा मरगज (वय 80) या ज्येष्ठ नागरिक महिलेचा खून झाला आहे

viara vcc
viara vcc

याप्रकरणी समीर बाळू मरगज (वय 27) यांनी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. कैलास कुंडलिक मरगज (वय 36, रा. करंज विहिरे, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने फिर्यादी यांची आजी सिंधुबाई विठोबा मरगज (वय 80) हिचेेकडील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेऊन आजीचा गळा दाबून खून केला. तिच्या अंगावरील पंचवीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे चंद्रकारे व दोन मणी असे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने महिलेचे प्रेत प्लास्टिक गोणी मध्ये घालून करंजविहीरे व धामणे या रस्त्यावर भामा नदीचे पात्रात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला .उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महाडिक हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"