फक्त मुद्द्याचं!

8th May 2026
अध्यात्म

श्री क्षेत्र मोरगाव, श्री क्षेत्र थेऊर व श्री क्षेत्र सिद्धटेक येथील मंदिरे जतन व संवर्धन कामांसाठी भाविकांसाठी बंद!

श्री क्षेत्र मोरगाव, श्री क्षेत्र थेऊर व श्री क्षेत्र सिद्धटेक येथील मंदिरे जतन व संवर्धन कामांसाठी भाविकांसाठी बंद!

१० मे ते ०९ जून या कालावधीत बंद; नित्य पूजा सुरू राहणार
पिंपरी : संपूर्ण महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या अष्टविनायक गणपती मंदिरांचे अष्टविनायक विकास आराखड्या अंतर्गत व पुरातत्त्व विभागाचे मार्गदर्शनाखाली अष्टविनायकातील सर्व मंदिरांचे जतन,देखभाल व दुरुस्ती कामांसाठी महाराष्ट्र शासनाने एक चांगला निधी उपलब्ध करून दिला आहे, पुरातत्त्व विभागामार्फत अष्टविनायकातील सर्व मंदिरांच्या जतन व संवर्धनाची कामे हाती घेण्यात आलेली आहेत.

viara vcc
viara vcc

मागील दोन महिन्यांपासून श्री मयुरेश्वर मंदिर, श्री क्षेत्र मोरगाव, श्री चिंतामणी मंदिर, श्री क्षेत्र थेऊर व श्री सिद्धिविनायक मंदिर श्री क्षेत्र सिद्धटेक येथे जतन, संवर्धन व दुरुस्तीची कामे सुरू आहेत. सध्या मुख्य मंदिर तसेच मंदिर परिसरातील जतन, दुरुस्ती व संवर्धनाची कामे प्रगतीपथावर आहेत. याच अनुषंगाने मंदिर परिसरात विविध कामे होत असताना, मंदिराचा गणेश मूर्ती असलेला मुख्य गाभारा व त्यापुढील सभामंडप याला पौराणिक काळाप्रमाणेच मूळ सुबक दगडी बांधकाम करुन त्याचे जतन व संवर्धनाचे काम करायचे आहे.

यासाठी पुरातत्त्व विभागाचे संचालक यांनी चिंचवड देवस्थान ट्रस्ट हे ज्या सह धर्मादाय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार काम करत असते . धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांच्या कडे वरील कामासाठी श्री क्षेत्र मोरगांव, थेऊर, व सिध्दटेक येथील मंदिरे एकाच वेळी बंद करण्यासाठी विनंती अर्ज केला होता, सह धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांनी पुरातत्त्व विभाग, मंदिर प्रशासन, पुजारी वर्ग, ग्रामस्थ यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत चालू असेलेले हे अष्टविनायक मंदिर जतन संवर्धन आणि देखभाल दुरुस्ती काम जलदगतीने पुर्ण व्हावे यासाठी श्री क्षेत्र मोरगांव, श्री क्षेत्र थेऊर, श्री क्षेत्र सिध्दटेक येथील गणेश मंदिरे दिनांक १० मे २०२६ पासून ते ९ जून २०२६ पर्यंत पुर्णपणे सर्व भाविकांना दर्शनासाठी बंद राहिल असे आदेश दि.७ मे २०२६ रोजी दिले आहेत

या अनुषंगाने सह धर्मादाय आयुक्त,पुणे विभाग यांच्या सूचनेनुसार चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने वरील मोरगांव, थेऊर,सिध्दटेक येथील गणेश मंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा ठराव घेतला असून, सह धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांच्या सूचनेनुसार पुरातत्त्व विभाग हा दि. ८ मे २०२६ रोजी वरील तीन ठिकाणी ग्रामस्थ यांच्या सोबत ग्रामसभा घेऊन सह धर्मादाय आयुक्त यांनी मंदिर बंद ठेवण्याच्या आदेशाची माहिती दिलीआहे. त्यामुळे सह धर्मादाय आयुक्त,पुणे विभाग यांच्या आदेशानुसार श्री मयुरेश्वर मंदिर श्री क्षेत्र मोरगाव, श्री चिंतामणी मंदिर श्री क्षेत्र थेऊर व श्री सिद्धिविनायक श्री क्षेत्र सिद्धटेक येथील मंदिरे दिनांक १० मे ते ०९ जून २०२६ या कालावधीत जतन व संवर्धन कामांसाठी भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती मंदार देव महाराज, (मुख्य विश्वस्त, चिंचवड देवस्थान ट्रस्ट) यांनी दिली आहे.

महत्वाच्या सूचना
नित्य पूजा सुरू राहणार: मंदिरे दर्शनासाठी बंद असले तरी श्रींची यांची नित्य पूजाअर्चा व इतर धार्मिक विधी सुरू राहतील.
थेट दर्शन बंद: या कालावधीत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही.
प्रवेशावर निर्बंध: मंदीरांचे पुजारी, बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी, कर्मचारी व विश्वस्त यांच्याशिवाय अन्य कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"