फक्त मुद्द्याचं!

8th May 2026
महाराष्ट्र

राज्यात दहावीचा निकाल 92.9%; कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62%!

राज्यात दहावीचा निकाल 92.9%; कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62%!

दहावीच्या परीक्षेत 189 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यावर्षी राज्यात दहावीचा निकाल 92.9% लागला आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62% लागला आहे. दहावीच्या परीक्षेत 189 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत

viara vcc
viara vcc

दहावीच्या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण, या नऊ विभागीय मंडळामधून एकूण 15 लाख 55 हजार 26 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 92.09 आहे. राज्यातील 6,612 शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर चार लाख 82 हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 94% आहे.
दहावीच्या या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 29 हजार पाचशे सहा खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 28 हजार 825 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट होते. त्यापैकी 22 003 त्यांची एकूण उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 76.33% आहे.
नऊ विभागाची आकडेवारी
कोकण – 97.62%, पुणे– 94.24%, नागपूर– 89.07%, मुंबई -94.97%, कोल्हापूर– 95.47%, अमरावती– 90.50%, नाशिक -90.53%, लातूर– 88.42% , छत्रपती संभाजी नगर– 88.41%

राज्य मंडळाकडून दहा विशेष समुपदेशकांची नियुक्ती
दहावीच्या निकालामध्ये अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही. त्यामुळे चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही या विचाराने विद्यार्थी तणावाखाली येतात. या विद्यार्थ्यांना मार्ग दाखवण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी राज्य मंडळाकडून दहा विशेष समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. दहावीच्या निकालामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला अपेक्षित यश न मिळणे, विद्यार्थी अनुत्तीर्ण होणे, काही ठराविक विषयांमध्ये कमी गुण मिळणे असे प्रकार घडतात.

त्यामुळे चांगल्या महाविद्यालयात आणि पाहिजे असलेल्या शाखेत प्रवेश मिळण्याची शक्यता कठीण बनते. त्यामुळे अनेक विद्यार्थी पालकांच्या भीतीने तणावाखाली येतात. विद्यार्थी तणावाखाली आल्याने अनेकदा चुकीचे पाऊल उचलतात. विद्यार्थ्यांनी चुकीचे पाऊल उचलू नये यासाठी राज्य मंडळाकडून दरवर्षी विद्यार्थी व पालकांच्या समुपदेशनासाठी समूपदेशकांची नियुक्ती करण्यात येते. हे समुपदेशक विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करून तणावातून बाहेर येण्यासाठी मदत करणार आहेत. हे समुपदेशन निकालाच्या दिवसापासून आठ दिवस रोज सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत उपलब्ध असणार आहेत सर्व विद्यार्थी आणि पालकांनी या सुविधेची नोंद घ्यावी असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"