नोकरी लावण्याच्या बहाण्याने 7 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : आयटी कंपनीमध्ये नोकरी लावून देतो असे सांगून फिर्यादी व त्यांच्या चार मित्रांकडून 7 लाख 60 हजार रुपये एवढी रक्कम घेऊन फसवणूक केली. ही घटना 30 मार्च ते आज पर्यंत गेरा इम्पेरिया फेस दोन हिंजवडी येथे घडली.

याप्रकरणी दिनेश दत्तात्रेय भनंग (वय 28, रा. माऊली हाईटस, फ्लॅट नंबर 203, पौड रोड, भुकूम, ता. मुळशी, मुळगाव- खांडे पारगाव, ता. बीड, जि. बीड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शिंक्राटेक एक्स कन्सल्टन्सी गेरा इम्पेरिया फेज दोन, हिंजवडी) या कंपनीच्या संचालकांनी संचालक असलेल्या बावीस वर्षे महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांनी फिर्यादी आणि त्यांच्या चार मित्रांना दोन महिन्यात चांगल्या आयटी कंपनीमध्ये नोकरी लावून देतो असे आश्वासन देऊन त्याकरिता ते स्वतः कमिशन म्हणून प्रत्येक कॅंडिडेट कडून पन्नास हजार रुपये कमिशन लागेल असे सांगितले. फिर्यादींचा विश्वास संपादन करून फिर्यादी कडून प्रत्येकी दोन लाख दहा हजार तसेच इतर चार मित्रांकडून मिळून पाच लाख 50 हजार असे एकूण सात लाख साठ हजार एवढी रक्कम घेऊन दोन महिन्यानंतरही आजपर्यंत कोणत्याही प्रकारची नोकरी न लावता तसेच कमिशन म्हणून घेतलेले पैसे आज पर्यंत परत केले नाही. फिर्यादी यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने व पैसे परत करण्यासाठी वेळोवेळी आरोपी यांच्याकडे पाठपुरावा केला. तरीही त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन फिर्यादी व त्यांच्या मित्राची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोरे हे तपास करत आहेत.

