Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

15th September 2026
गुन्हेगारी

फ्लॅट विकत देण्याचे अमिष दाखवून अकरा लाख 78 हजार रुपयांची फसवणूक!

फ्लॅट विकत देण्याचे अमिष दाखवून अकरा लाख 78 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : वन बीएचके फ्लॅट विकत देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून वेळोवेळी या पोटी 11 लाख 78 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. ही घटना 2019 ते आज पर्यंत सर्वे नंबर 121/ 3, भुमकर चौक, वाकड, ता. मुळशी येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी संतोष नारायण चिखलकर (वय 47, टाईप सी 17/10, अनुविकास कॉलनी, भोईसर, ता.जि. पालघर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गौरव सचदेवा (रा. ऑफिस पत्ता, बी 44 तिसरा मजला, डबल स्टोरी लाजपत नगर- 4, दिल्ली, सध्या- रा. नोएडा, उत्तर प्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून त्यांना एक बीएचके फ्लॅट विकत देण्याचे अमिष दाखवून फिर्यादी कडून वेळोवेळी 11 लाख 78 हजार रुपये घेऊन फ्लॅट विकत न देता सदर रकमेचा अपहरण करून विश्वासघात व फसवणूक केली. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांचाळ हे तपास करत आहेत .

indra dairy
indra dairy

70 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन चोरट्याने लांबवली!
पिंपरी : महिला आपल्या कुटुंबासमवेत स्टॉल वरती गणपती खरेदी करण्यासाठी गेल्या असता मुलीच्या गळ्यातील 70 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन चोरीला गेली. ही घटना सोमवार 14 सप्टेंबर रोजी सकाळी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कस्पटे वस्ती, काळेवाडी फाटा, सांगवी वाहतूक विभागासमोर, वाकड येथे घडली.

याप्रकरणी एका तीस वर्षीय महिलेने (रा. आक्षय पार्क, सी विंग 105 ,थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्यादी आहे. गोरख दशरथ सुखळे (वय 40, रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या कुटुंबासह सांगवी वाहतूक विभागा समोरील स्टॉलवर गणपती खरेदी करण्यासाठी गेल्या असता फिर्यादी यांच्या मुलीच्या गळ्यातील 70 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन गोरख दशरथ सुकळे (रा. भोसरी) याने चोरी करून घेऊन गेला. वाकड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे हे तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"