Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

2nd October 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती!

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती!

पिंपरी : भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. प्रसिद्धीप्रमुख आणि वरिष्ठ उपाध्यक्ष अशा विविध पदांवर काम केलेल्या पटनी यांच्यावर पक्षाने आता सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली आहे.

viara vcc
viara vcc

पटनी हे गेल्या २० वर्षांपासून आमदार महेश लांडगे यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत सक्रिय सहभागी आहेत. पक्षाचे कार्यक्रम, संघटनात्मक उपक्रम आणि भाजपा परिवारातील विविध संस्था व संघटनांच्या कार्यात त्यांचा सातत्याने सहभाग राहिला आहे. शहरातील राजस्थानी, मारवाडी आणि हिंदीभाषिक समाजातील विविध घटकांशी त्यांचा व्यापक जनसंपर्क आहे.

indra dairy
indra dairy

पटनी यांच्या नियुक्तीबद्दल आमदार महेश लांडगे यांनी आनंद व्यक्त केला. गेल्या दोन दशकांतील त्यांची साथ, नि:स्वार्थ पक्षकार्य आणि कार्यकर्त्यांशी असलेले आत्मीय संबंध मोलाचे आहेत. त्यांच्या निष्ठेला आणि समर्पित कार्याला पक्षश्रेष्ठींनी योग्य न्याय दिल्याची भावना लांडगे यांनी व्यक्त केली. पटनी यांच्या अनुभवाचा आणि जनसंपर्काचा शहरातील पक्षसंघटनाला लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"