Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

2nd October 2026
पिंपरी-चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

६१० कोटींचा मालमत्ता कर वसूल; वाकड झोनची सर्वाधिक कर वसुली
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने २०२६-२७ या आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ६१० कोटी ४४ लाखांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. पहिल्या सहामाहीत विविध कर सवलतींचा लाभ घेत कर भरणाऱ्यांचा आलेख झपाट्याने वाढत आहे. यंदा ७ लाख ६६ हजार नोंदणीकृत मालमत्ता धारकांपैकी ५ लाख ९ हजार २०० नागरिकांनी म्हणजे तब्बल ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. दरवर्षीप्रमाणे ऑनलाइन माध्यमातून बिल भरण्यास नागरिकांनी मोठी पसंती दिली आहे.

viara vcc
viara vcc

शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा ७ लाख ६६ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभाग कर वसूल करत आहे. गतवर्षी या विभागाच्या वतीने राबविलेल्या विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, मालमत्ता धारकांना नोटीसा, थकबाकीदारांची वृत्तपत्रात नावांची यादी प्रसिद्ध करणे यासह यंदा महिला बचत गटांच्या माध्यमातून बिलांचे घरपोच वाटप, रिक्षाव्दारे जनजागृती, प्रत्येक व्यक्तीला त्याची मालमत्ता कराची रक्कम आणि सवलतीची रक्कम सांगणारा एसएमएस पाठवला जात होता. अशा विविध बाबींमुळे पहिल्या सहामाहीत कर भरणाऱ्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे.

indra dairy
indra dairy

गतवर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत ४ लाख ७८ हजार २६८ मालमत्ता धारकांनी ६०३ कोटींचा कर भरणा केला होता. यंदा नोंदणीकृत ७ लाख ६६ हजार मालमत्ता धारकांपैकी ५ लाख ९ हजार २०० मालमत्ता धारकांनी विविध कर सवलतींचा लाभ घेत सहा महिन्यांत कराचा भरणा केला आहे. या मालमत्ता धारकांनी तब्बल ६१० कोटी ४४ लाख रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे. गतवर्षापेक्षा ६ कोटी ६२ लाख रुपयांची अधिकची वसुली झाल्याचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.

ऑनलाइन कर भरण्यास नागरिकांची पसंती
महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन कर भरण्याच्या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या कराचा भरणा करणे शक्य झाले आहे. या सुविधेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या सहामाहीत शहरातील ५ लाख ९ हजार ९०० नागरिकांनी कराचा भरणा केला आहे. यामध्ये तब्बल ४ लाख ४५ हजार मालमत्ता धारकांनी ४७१ कोटी ८३ लाख रुपयांचा ऑनलाइनच्या माध्यमातून कराचा भरणा केला आहे.

वाकड झोनची सर्वाधिक कर वसुली
महापालिकेची १८ करसंकलन विभागीय कार्यालये आहेत. यामध्ये वाकड करसंकलन कार्यालयाने सर्वाधिक तब्बल ८४ कोटी ९१ लाख, त्यापाठोपाठ थेरगाव ५३ कोटी १५ लाख, कस्पटे वस्ती कार्यालयाने ४५ कोटी १९ लाख, किवळेतून ४४ कोटी ९१ लाख, पिंपरी नगर ४४ कोटी ९९ लाख, चिखली करसंकलन कार्यालयाने ४४ कोटी ६१ लाख तर सर्वात कमी तळवडे कार्यालयाने ११ कोटी ९९ लाख रुपयांचा कर वसूल केला आहे.

मागील चार वर्षांत सहामाहीत वसुलीचा वाढता आलेख
२०२३-२४ : ५९० कोटी ६० लाख ,२०२४-२५ : ५१२ कोटी ६२ लाख ,२०२५-२६ : ६०३ कोटी ८२ लाख, २०२६-२७ : ६१० कोटी ४४ लाख

निवासी मालमत्ता धारकांची कर भरण्यात आघाडी
निवासी : ४ लाख ५१ हजार ७३९, बिगरनिवासी : ४० हजार १९७, मिश्र : १० हजार ४४ ,औद्योगिक : ३ हजार ६६७ ,मोकळ्या जमीन : ३ हजार ४८९

मालमत्ता कर हा महापालिकेच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्या सहामाहीत प्रथमच ६१० कोटींचा कराचा भरणा झाला आहे. कर भरून शहर विकासात योगदान देणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार. यापुढील काळात थकबाकीदार मालमत्तांकडून कर वसुलीला प्राधान्य देण्यात येणार आहे. – डॉ. विजय सुर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"