फक्त मुद्द्याचं!

15th April 2026
पिंपरी-चिंचवड

सह्यांद्री किंग्ज्‌‍ संघ उपांत्य फेरीत; शेट्टी बन्ट् वॉरीयर संघाचा सलग दुसरा विजय !

सह्यांद्री किंग्ज्‌‍ संघ उपांत्य फेरीत; शेट्टी बन्ट् वॉरीयर संघाचा सलग दुसरा विजय !

दुसरी ‌‘पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग‌’ टी-२० क्रिकेट स्पर्धा ; सह्यांद्री किंग्ज्‌चा सुशांत अभंग सामनावीर
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित दुसऱ्या “पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग‌’ (पीसीपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेत सह्यांद्री किंग्ज्‌‍ संघाने सलग चौथा विजय मिळवून प्रथम उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. शेट्टी बन्ट् वॉरीयर संघाने सलग दुसरा विजय मिळवून आगेकूच केली.

viara vcc
viara vcc

सह्यांद्री किंग्ज्‌‍ संघाने मोरे पाटील पॅकर्स संघाचा केला ४ गडी राखून पराभव
हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सुशांत अभंग याने केलेल्या ५८ धावांच्या जोरावर सह्यांद्री किंग्ज्‌‍ संघाने मोरे पाटील पॅकर्स संघाचा ४ गडी राखून पराभव करून सलग चौथा विजय मिळवला. पहिल्यांदा खेळणाऱ्या मोरे पाटील पॅकर्सने २० षटकात १५० धावांचे लक्ष्य उभे केले. तिलक जाधव याने ५७ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांसह ९२ धावांची खेळी केली. हे लक्ष्य सह्यांद्री किंग्ज्‌‍ संघाने १८.३ षटकात व ६ गडी गमावून पूर्ण केले. सुशांत अभंग याने ३४ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकारासह ५८ धावांची खेळी केली. बालाजी महानवर (३० धावा) आणि गिगी खोखर (नाबाद ३० धावा) यांनी धावांचे योगदान देत संघाचा विजय सोपा केला. या विजयामुळे सह्यांद्री किंग्ज्‌‍ संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.

शेट्टी बन्ट् वॉरीयर संघाने सोनीगरा सुपरकिंग्ज्‌‍ संघाचा केला ४ गडी राखून पराभव
यश जाधव याने केलेल्या कामगिरीच्या जोरावर शेट्टी बन्ट् वॉरीयर संघाने सोनीगरा सुपरकिंग्ज्‌‍ संघाचा ४ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना सोनीगरा सुपरकिंग्ज्‌‍ संघाने २० षटकात १०० धावा धावफलकावर लावल्या. राजेश पवार (३७ धावा) आणि गोरक्ष जाधव (२० धावा) यांनी धावांचे योगदान दिले. गणेश कलाल, क्षितीज अगरवाल आणि रणवीर सिंग यांनी प्रत्येकी दोन गडी टिपले. हे लक्ष्य शेट्टी बंन्ट् वॉरीयर संघाने १८.१ षटकात पूर्ण केले. ऋषी बारणे (नाबाद ३० धावा), यश जाधव (२१ धावा) आणि पारस चव्हाण (नाबाद १७ धावा) यांनी धावा जमवून संघाचा विजय निश्चित केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरी
मोरे पाटील पॅकर्सः २० षटकात ७ गडी बाद १५० धावा (तिलक जाधव ९२ (५७, ६ चौकार, ५ षटकार), कार्तिक शेवाळे नाबाद २५, अभिषेक राय २-३०, मयुर गोखले २-४३) पराभूत वि.
सह्यांद्री किंग्ज्‌ः १८.३ षटकात ६ गडी बाद १५१ धावा (सुशांत अभंग ५८ (३४, ९ चौकार, १ षटकार), बालाजी महानवर ३०, गिगी खोखर नाबाद ३०, फैयाझ लांगडे २-२४, वेदांत चौधरी २-३४); सामनावीरः सुशांत अभंग.

सोनीगरा सुपरकिंग्ज्‌ः २० षटकात १० गडी बाद १०० धावा (राजेश पवार ३७, गोरक्ष जाधव २०, गणेश कलाल २-१२, क्षितीज अगरवाल २-२८, रणवीर सिंग २-१३) पराभूत वि.
शेट्टी बंन्ट् वॉरीयरः १८.१ षटकात ६ गडी बाद १०२ धावा (ऋषी बारणे नाबाद ३०, यश जाधव २१, पारस चव्हाण नाबाद १७, गौरव जोत्शी २-१४); सामनावीरः यश जाधव;
आधी, पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीशभाई शेट्टी यांच्या मातोश्री प्रफुल्ला शंकर शेट्टी यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. सामना सुरू होण्याआधी खेळाडूंनी कै. प्रफुल्ला शेट्टी यांना श्रद्धांजली वाहीली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"