Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
गुन्हेगारी

फेक इ चलन फाईल पाठवून 6 लाख 88 हजार रुपये लंपास!

फेक इ चलन फाईल पाठवून 6 लाख 88 हजार रुपये लंपास!

पिंपरी : मोबाईलवर ट्रॅफिक इ चलन आल्याचे भासवून एका अज्ञात सायबर चोरट्याने व्यावसायिकाच्या बँक खात्यातून सहा लाख 88 हजार रुपये लंपास केले. ही घटना बुधवार 2 सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

याप्रकरणी इंदल नथुनी चव्हाण (वय 44, इंग्लिश स्कूल शेजारी, शिवशंभू निवास, नेहरूनगर पिंपरी) यांनी फिर्याद नोंदवली आहे. व्हाट्सअप वर इ चलन फाईल पाठवणाऱ्या एका अज्ञात चोरटेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायबर सोरट्याने फिर्यादीच्या व्हाट्सअप वर इ चलन असल्याचे भासवून एपीके फाईल पाठवली .फिर्यादीने ती फाईल उघडताच आरोपीने त्यांच्या मोबाईलचा बेकायदा ॲक्सेस मिळवून फिर्यादीच्या आयडीबीआय बँकेच्या खात्यावरून परस्पर सहा लाख 88 हजार रुपये ट्रान्सफर करून आर्थिक फसवणूक केली .या गुन्ह्याचा तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत .

gokul astami
gokul astami

महिलेच्या बँक खात्यातून परस्पर सहा लाख रुपये काढले!
पिंपरी : तळवडे परिसरात राहणाऱ्या एका महिलेची सायबर चोरट्यांनी गोपनीय माहिती न घेताच खात्यातून परस्पर पाच लाख 94 हजार रुपये काढून फसवणूक केली. ही घटना गुरुवार 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

प्रियंका विठ्ठल वाघाडे (वय 33, रा. साईनाथ हाऊसिंग सोसायटी, राही हाईट्स ,तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात सायबर सोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेने कोणालाही ओटीपी ,पासवर्ड किंवा गोपनीय माहिती शेअर केलेली नव्हती. तरीही अज्ञात आरोपीने महिलेच्या एचडीएफसी बँक खात्यातून पाच लाख 94 हजार 995 रुपये परस्पर काढून घेतले .चिखली पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"