Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
गुन्हेगारी

एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांना अटक!

एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांना अटक!

पिंपरी : बेकायदा मेफेड्राॅन (एमडी) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या दोन तरुणांना दिघी पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवार 4 सप्टेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास चऱ्होली बुद्रुक येथील धानोरी रोडवर करण्यात आली.

पोलीस शिपाई सुधीर हरिचंद्र डोळस यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंकित अर्जुन थोरात (वय 25, रा. चांडोली बुद्रुक, ता आंबेगाव), शुभम बाळकृष्ण उमाळे (वय 27, रा. राजीव गांधी नगर, खडकी) या दोघांना अटक करण्यात आली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी चऱ्होली परिसरात एमडी ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पहाटेच्या सुमारास छापा टाकून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा ग्रॅम मेफेड्रॅान हा अंमली पदार्थ, तीन मोबाईल फोन आणि एक ऍक्टिवा दुचाकी असा एकूण 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दिघी पोलीस तपास करत आहेत.

gokul astami
gokul astami

हिंजवडीत पार्क केलेली दुचाकी चोरीला
पिंपरी : हँडल लॉक करून पार्क केलेली पन्नास हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली. ही घटना गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रात्री दोन ते शुक्रवार सकाळी नऊच्या दरम्यान हिंजवडी विठाई नगर, साखरे वस्ती येथे घडली. केशव आदित्य चव्हाण (वय 22 विठाई नगर, साखरे वस्ती, ता मुळशी, मूळ- रा. गंगाखेड, जि. परभणी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे नेहमीप्रमाणे त्यांची पन्नास हजार रुपये किंमतीची हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल एमएच 22 /0867) हॅण्डल लॉक करून पार्क केली होती. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताने गाडीचे हँडल लॉक तोडून ती चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"