Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
पिंपरी-चिंचवड

गणेशोत्सवासाठी स्वच्छता, निर्माल्य संकलन आणि विसर्जन व्यवस्थेचे नियोजन!

गणेशोत्सवासाठी स्वच्छता, निर्माल्य संकलन आणि विसर्जन व्यवस्थेचे नियोजन!

पिंपरी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यासह गणेशमूर्ती विसर्जनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाची आढावा बैठक पार पडली. गणेशोत्सव काळात नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि स्वच्छतेच्या दृष्टीने कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा आढावा उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी घेतला.

gokul astami
gokul astami

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात ही बैठक झाली. यावेळी सहायक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, राजू साबळे, सुधीर वाघमारे, महेश आढाव, अंकुश झिटे, राजेश भाट, अतुल सोनवणे, मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता व्यवस्था प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने नियोजन करावे. सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख रस्ते, गणेश मंडळांचे परिसर तसेच विसर्जन मार्गांची नियमित स्वच्छता राखावी. विसर्जनस्थळी आवश्यक मनुष्यबळ, साधनसामग्री आणि स्वच्छता सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात. नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेत गणेशोत्सवासाठीची सर्व तयारी वेळेत पूर्ण करावी.

निर्माल्य कुंड, कृत्रिम जलकुंडांची व्यवस्था
गणेशोत्सवाच्या कालावधीत शहरातील सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख रस्ते, गणेश मंडळांचे परिसर तसेच विसर्जन मार्गांवरील स्वच्छता सुरळीत राहण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कुंड तसेच गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम जलकुंडांची पुरेशी व्यवस्था करण्याचे निर्देश डॉ. ठेंगल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

विसर्जनस्थळी आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासह निर्माल्य संकलनाची व्यवस्था प्रभावीपणे राबवावी. विसर्जनस्थळी जमा होणारे निर्माल्य नियमितपणे उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. गणेशोत्सव काळात नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन स्वच्छता कर्मचाऱ्यांची आवश्यक तैनाती करावी, असेही निर्देश देण्यात आले.

विसर्जन मार्गांवरील स्वच्छतेवर विशेष भर
गणेशोत्सव काळात गणेश मंडळांचे परिसर, सार्वजनिक ठिकाणे आणि विसर्जन मार्गांची नियमित स्वच्छता करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर कचरा साचणार नाही, यासाठी आवश्यक नियोजन करावे. विसर्जनानंतर संबंधित ठिकाणांची तातडीने स्वच्छता करून परिसर पूर्ववत करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असेही बैठकीत सांगण्यात आले.

गणेशोत्सव काळात स्वच्छता व्यवस्था, निर्माल्य संकलन, कृत्रिम जलकुंडांची व्यवस्था आणि विसर्जनस्थळी आवश्यक सुविधा याबाबत सर्व संबंधितांनी समन्वयाने कार्यवाही करावी. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित गणेशोत्सवाचा अनुभव मिळण्यासाठी आवश्यक सर्व तयारी वेळेत पूर्ण करावी, असे डॉ. ठेंगल यांनी यावेळी सांगितले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"