फक्त मुद्द्याचं!

27th May 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा २३० कोटींहून अधिक मालमत्ता कर वसूल!

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा २३० कोटींहून अधिक मालमत्ता कर वसूल!

दोन लाखांहून अधिक मिळकतधारकांनी भरला कर
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये १ एप्रिल २०२६ ते २६ मे २०२६ (दुपारी १२ वाजेपर्यंत) या कालावधीत २३० कोटींहून अधिक मालमत्ता कर वसूल केला आहे.आतापर्यंत शहरातील २ लाख ३२ हजार ३८५ मिळकतधारकांनी मालमत्ता कराचा भरणा केला असून, उर्वरित मालमत्ताधारकांनी लवकरात लवकर मालमत्ता कर भरावा, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांसाठी विविध सवलती लागू करण्यात आल्या असून, त्याला शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत २ लाख ८ हजार ५७० नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरून १० टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे. या नागरिकांकडून २१२ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कराचा भरणा डिजिटल माध्यमातून करण्यात आला आहे. डिजिटल माध्यमातून कर भरण्याचे प्रमाण वाढत आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र वापराच्या तसेच मोकळ्या जागांसह एकूण ७ लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या सर्व मालमत्ताधारकांना चालू आर्थिक वर्षाचे कर देयक वेळेत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

महापालिकेकडून महिलांच्या नावावरील मालमत्ता, दिव्यांग नागरिक,पर्यावरणपूरक निवासी गृहनिर्माण संस्थांसाठी विविध सवलती देण्यात येत आहेत. विशेषतः ऑनलाइन कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी १० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक डिजिटल पद्धतीचा वापर करत आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महापालिकेच्या कार्यालयात प्रत्यक्ष गर्दी टाळून घरबसल्या ऑनलाइन माध्यमातून मालमत्ता कर भरावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"