फक्त मुद्द्याचं!

27th May 2026
गुन्हेगारी

तडीपार केलेल्या आरोपीस अटक!

तडीपार केलेल्या आरोपीस अटक!

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांनी दोन वर्षाकरिता तडीपार केलेला आरोपी पिंपरी चिंचवड हद्दीत मिळून आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवार 25 मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपनीच्या मोकळे मैदानात, पिंपरी येथे करण्यात आली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी भागवत गायकवाड पोलीस शिपाई, संत तुकारामनगर यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिनेश गोरख माने (वय 31, रा. साईबाबा मंदिर शेजारी, विटकर चाळ, नेहरूनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांनी आरोपीस पिंपरी चिंचवड ,पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून दोन वर्षाकरिता तडीपार केलेले असताना बेकायदेशीरित्या आदेशाचा भंग करून पिंपरी चिंचवड हद्दीत प्रवेश केला होता. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घातक शस्त्र जवळ बाळगण्यास प्रतिबंध असताना आरोपीने या आदेशाचा भंग करून आपल्याजवळ धारदार लोखंडी कोयता बाळगून दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबलेला असताना मिळून आला. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार असवले हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"