फक्त मुद्द्याचं!

27th May 2026
गुन्हेगारी

एमडी (मॅफेड्रॅान) पावडर विक्रीसाठी बाळगल्याने एका व्यक्तीस अटक!

एमडी (मॅफेड्रॅान) पावडर विक्रीसाठी बाळगल्याने एका व्यक्तीस अटक!

पिंपरी : अंमली पदार्थ एमडी (मॅफेड्रॅान) पावडर विक्रीसाठी जवळ बाळगल्याने एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवार 25 मे रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास कस्पटे वस्ती, मुळा नदीवरील अर्धवट तयार ब्रिजवर, वाकड येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी वंदू दत्तात्रय गिरे पोलीस हवलदार ,वाकड पोलीस स्टेशन यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कमलेश भगवान ससाणे (वय 35, सर्वे नंबर 132/ 3, बालेवाडी फाटा, बाणेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने 27 हजार 400 रुपये किंमतीचे 5.48 ग्रॅम मेफेड्रॉन पावडर अंमली पदार्थ प्लास्टिक पिशवीतून विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे आढळून आले. पांढरट मळकट रंगाचा हा अमली पदार्थ अनाधिकाराने बेकायदेशीररित्या विक्री करण्याकरिता आरोपी ब्रिज वर आला होता. आरोपीकडून एक मोबाईल फोन आणि एमडी पावडर असा एकूण 37 हजार चारशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाकड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"