पक्षासाठी प्रामाणिकपणे आणि अहोरात्र काम करणाऱ्यांनाच संधी: प्रदेश भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण

स्वीकृत नगरसेवक पदासाठी चमकोगिरी करणारे अस्वस्थ
पिंपरी : भारतीय जनता पक्षासाठी प्रामाणिकपणे आणि अहोरात्र काम करणाऱ्यांनाच संधी दिली जाणार आहे .पक्ष विरोधी काम करणाऱ्यांना कोणतेही पद दिले जाणार नाही. पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्यांनी अशा व्यक्तींची शिफारस प्रदेश तसेच शहर कमिटीकडे करू नये असा इशारा प्रदेश भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे. यामुळे पक्षाचे काम न करता शहरातील नेत्यांसाठी फक्त चमकोगिरी करणाऱ्यांचे हाल होणार आहेत.

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार 29 सप्टेंबर रोजी कासारवाडी येथील एका हॉटेलमध्ये झाली. यावेळी त्यांनी पक्षातील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना ,लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांना एक प्रकारे इशारास दिला आहे. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी बैठकीत सांगितले की, प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करणाऱ्यांनाच संधी दिली जाईल .पक्षाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा असा संदेश देखील त्यांनी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना दिला आहे.

महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्यांची यादी प्रदेश कमिटीकडे यापूर्वी सादर करण्यात आलेली आहे त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांची अडचण झाली आहे स्थानिक नेत्यांवर विसंबून असणारे अस्वस्थ झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप प्रदेश कमिटीने सेवा संकल्प अभियानांतर्गत शहरासाठी आमदार, नगरसेवकांसाठी तेरा वेगवेगळे कार्यक्रम आयोजनाचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंत केवळ दोनच कार्यक्रम झाले आहेत. आचारसंहितेमुळे कार्यक्रम घेता येत नसल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केली.
पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीस महापौर रवी लांडगे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप ,उमा खापरे ,माजी आमदार अश्विनी जगताप, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे ,प्रभारी भरत पाटील ,प्रदेश महामंत्री राजेश पांडे, माजी खासदार अमर साबळे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, मधुकर बच्चे, विकास डोळस, वैशाली खाडे आदी उपस्थित . बारा तासांच्या दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी आजी माजी पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्या घरी दाराआड चर्चा केल्या.

