Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

3rd October 2026
गुन्हेगारी

लग्नास नकार दिल्याने तरुणीवर चाकूने हल्ला!

लग्नास नकार दिल्याने तरुणीवर चाकूने हल्ला!

पिंपरी : तुझ्यामुळे मला कंपनीतून काढून टाकले आहे, तू माझ्याबरोबर का बोलत नाही, आपण दोघेजण लग्न करू असे एक व्यक्ती महिलेला रस्त्यात गाठून बोलला. परंतु सदर महिलेने तुझ्याबरोबर लग्न करणार नाही असे म्हटल्याने त्या व्यक्तीने चिडून महिलेला खाली पाडले. माझ्याशी लग्न करणार नसेल तर मी तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून धारदार चाकूने महिलेच्या छातीमध्ये उजव्या बाजूला वार केला. त्यानंतर डाव्या हाताच्या मनगटावर, पाठीवर उजव्या कानाजवळ चाकूने वार करून महिलेला गंभीर जखमी केले. ही घटना सोमवार 28 सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास परमार पीजी जवळ, सुखहर्ता सोसायटी, हिंजवडी, ता. मुळशी या ठिकाणी घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी एका 24 वर्षीय महिलेने (रा. स्काय लाईट पीजी, रूम नंबर 102, सुखहर्ता सोसायटी, हिंजवडी, मूळगाव- मु. पो. खेडी कोर्ट, ता. मुलताई, जि. बैतूल, मध्य प्रदेश)यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोनूकुमार भोला राय (वय 24, रा. स्काय लाईट पीजी, रूम नंबर 303, सुखहर्ता सोसायटी, हिंजवडी, ता. मुळशी, मुळगाव- रुचीपुराणा टोला, रामदिरी, चार वार्ड नंबर दोन, थाना. मटी हानी उलाव, जि. बेगुलसराई, बिहार) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

indra dairy
indra dairy

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची बहीण त्यांच्या स्काय लाईट पीजी सोसायटी मधून मदरसन कंपनीत पायी जात असताना परमार पीजी सुखहर्ता सोसायटी, हिंजवडी या ठिकाणी आले असता फिर्यादी यांचा मित्र आरोपी हा अचानक त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला तुझ्यामुळे मला कंपनीतून काढून टाकले तू माझ्याबरोबर काल बोलत नाही. आपण दोघेजण लग्न करू असे फिर्यादी यांना बोलला असता फिर्यादी यांनी तुझ्याबरोबर लग्न करणार नाही असे स्पष्ट सांगितले.

त्यामुळे चिडून आरोपीने फिर्यादी यांना खाली पाडले. तू जर माझ्याशी लग्न करणार नसेल तर मी तुला जिवंत सोडणार नाही. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांनी जवळील धारदार चाकूने फिर्यादी यांच्या छातीमध्ये उजव्या बाजूला वार करून त्यानंतर डाव्या हाताच्या मनगटावर, पाठीवर, उजव्या कानाजवळ, वार करून फिर्यादीला गंभीर जखमी केले. फिर्यादी यांची बहीण सोडवण्यासाठी मध्ये आली असता तिला देखील धमकी दिली. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ताकतोडे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"