Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

19th September 2026
गुन्हेगारी

बांधकाम साईड वरील खड्ड्यातील पाणी काढताना शॉक बसून एकाचा मृत्यू!

बांधकाम साईड वरील खड्ड्यातील पाणी काढताना शॉक बसून एकाचा मृत्यू!

पिंपरी : बांधकाम साइटवर काम करत असताना खड्ड्यामधील इलेक्ट्रिक पंपाने पाणी काढण्यासाठी खड्ड्यात उतरलेल्या तरुणाने आवाज देण्यापूर्वीच इलेक्ट्रिक मोटार सुरू करण्यात आली. यामध्ये इलेक्ट्रिक शॉक बसून तरुण बेशुद्ध होऊन मरण पावला. ही घटना शुक्रवार 18 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास श्री सीबीएनजे इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, फुलेनगर, एमआयडीसी भोसरी येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी निरज शिवप्रसाद आदिवासी (कौल) (वय 22, रा. कलोवनी वस्ती, डिके चौकाजवळ चाकण, ता. खेड, मूळ- बडा गाव तौथर, जि.रिवाज मध्यप्रदेश) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राधेश्याम उर्फ उमाशंकर रामकरण आदिवासी (कौल) (वय 29, सध्या रा. फुलेनगर, एमआयडीसी भोसरी, मूळ- रा. अभयपूर चीपिया, आमगोदर, इलाहाबाद ,उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

indra dairy
indra dairy

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा मोठा भाऊ सुरज शिवप्रसाद आदिवासी (वय 25) हा श्री सीबीएनजे इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फुलेनगरच्या बांधकाम साइटवर काम करत असताना खड्ड्यामधील पाणी इलेक्ट्रिक पंपाने काढण्यासाठी खड्ड्यामध्ये उतरला होता. त्यावेळी सुरज आदिवासी याने आवाज देण्यापूर्वीच निष्काळजीपणाने इलेक्ट्रिक मोटार आरोपीने चालू केली. त्यामुळे इलेक्ट्रिक शॉक बसून शिवप्रसाद बेशुद्ध होऊन मरण पावला. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तळेकर हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"