Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

19th September 2026
गुन्हेगारी

जमीन विक्रीच्या नावाखाली 60 लाखाची फसवणूक!

जमीन विक्रीच्या नावाखाली 60 लाखाची फसवणूक!

पिंपरी : चाळीस गुंठे जमीन विक्रीस असल्याचे सांगून बनावट कागदपत्राच्या आधारे विश्वास संपादन केला. एका व्यक्तीकडून ऑनलाइन ८० लाख रुपये घेऊन जमीन विक्री न करता त्यापैकी 19 लाख 19 हजार रुपये परत करून उर्वरित साठ लाख एक हजार रुपये न दिल्याने दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुगाव येथे 12 डिसेंबर 2021 ते 17 सप्टेंबर 2026 या कालावधीत हा प्रकार घडला.

viara vcc
viara vcc

अरविंद अनिल माळी (वय 44, रा. थेरगाव रोड, डांगे चौक) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सुधीर रमेश बोराटे (वय 42, रा. बावधन), सचिन जोरी (वय 40, रा.माले ,ता. मुळशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

indra dairy
indra dairy

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी माळी यांना चाळीस गुंठे जमीन विक्रीस असल्याचे सांगितले. त्यासाठी वेगवेगळी कागदपत्रे दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून ऑनलाइन स्वरूपात 80 लाख रुपये घेतले. मात्र ठरल्याप्रमाणे जमीन विक्री केली नाही. पैसे परत मिळविण्यासाठी माळी यांनी तगादा लावल्यानंतर आरोपींनी 19 लाख 99 हजार रुपये परत केले. उर्वरित 60 लाख हजार रुपये परत न देता आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. बावधन पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"