Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

19th September 2026
गुन्हेगारी

झोपेतून उठवल्यामुळे नातवाकडून आजीचा खून!

झोपेतून उठवल्यामुळे नातवाकडून आजीचा खून!

पिंपरी : झोपेतून उठवल्याच्या रागातून नातवाने आपल्या 75 वर्षीय आजीच्या डोक्यात स्टीलचा तांब्या मारून तिला जमिनीवर आपटले. गंभीर दुखापत झाल्याने आजीचा जागीच मृत्यू झाला. चऱ्होली येथील पंतप्रधान आवास योजना म्हाडा इमारतीमध्ये गुरुवार 17 सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना घडली.

माया लक्ष्मण अहिवळे (वय 75 )असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी साईनाथ नागनाथ थोरात (वय 50, रा. चऱ्होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा स्वप्नील साईनाथ थोरात (वय 25, रा.चऱ्होली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी साईनाथ यांची सासू माया अहिवळे यांनी घरात घाण केल्याच्या कारणावरून स्वप्नीलला सुनावले. तसेच तो झोपलेला असताना त्यांच्या बडबडीमुळे आरोपीची झोपमोड झाली. याचा राग आल्याने स्वप्नीलने स्टीलचा तांब्या आजीच्या डोक्यात मारून तिला जमिनीवर आपटले. यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दिघी पोलीस तपास करत आहेत.

indra dairy
indra dairy

आगीत सापडलेल्या दोन मुलींची सुटका!
पिंपरी : पिंपळे सौदागर येथील गणेशम फेज- टू या हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीतील एका सदनिकेस अचानक आग लागली. महापालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी जाऊन तातडीने मदत कार्य सुरू केले. आगीच्या भक्षस्थानी सापडलेल्या दोन मुलींची सुटका केली. ही घटना शुक्रवार 18 सप्टेंबर रोजी घडली.

आगीची घटना समजताच स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेवक नाना काटे यांनी तातडीने अग्निशामक दलास संपर्क साधून मदत उपलब्ध केली. याशिवाय तातडीने घटनास्थळी जाऊन सहकार्य केले. आगीत एका फ्लॅटमध्ये दोन मुली अडकल्याचे समजताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने कार्य सुरू करुन त्यांची सुखरूप सुटका केली. या मुलींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशामक जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"