Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

3rd October 2026
पिंपरी-चिंचवड

सातव्या दिवशी विसर्जन मिरवणुकीतील ध्वनी प्रदूषण; 20 गुन्हे दाखल!

सातव्या दिवशी विसर्जन मिरवणुकीतील ध्वनी प्रदूषण; 20 गुन्हे दाखल!

पिंपरी : गणेश विसर्जनाच्या सातव्या दिवसाच्या मिरवणुकीत निर्धारित ध्वनी मर्यादा झुगारून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या डीजे चालक व गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 20 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वाधिक नऊ गुन्ह्यांची नोंद सांगवी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

viara vcc
viara vcc

सातव्या दिवशी शिरगाव -परंदवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 38 सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन झाले. त्यापैकी चांदखेड येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळ आणि ओझर्डे येथील शिवतेज मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात ध्वनी प्रदूषण यंत्रणा वापरण्यात आल्याचे निदर्शनास आले. दोन्ही गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करून डीजे साऊंड सिस्टिम, दोन मिक्सर, दोन ऍम्प्लिफायर, एक वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

indra dairy
indra dairy

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश उत्सव सुरू होण्यापूर्वी पोलीस आयुक्त स्तरावर सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यामध्ये गणेशोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करावा अशी सूचना करण्यात आली होती. मात्र डीजे सारख्या उच्च क्षमतेच्या ध्वनीक्षेपकांचा निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करू नये आणि ध्वनी प्रदूषण टाळावे अशा स्पष्ट सूचना मंडळांना देण्यात आल्या होत्या. गणेश मंडळांना उत्सवासाठी आवश्यक परवानगी सह ध्वनी प्रदूषण बाबतचे नियम न्यायालय निर्देश आणि त्यांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाईची माहिती मंडळांना देण्यात आली होती.

सातव्या दिवसाच्या गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान काही मंडळांकडून या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आले. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे आणि डॉल्बी ध्वनिक्षेपक यंत्रणा वाजवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधित ठिकाणी कारवाई करण्यात आली. डीजे चालक आणि मालकाविरोधात गुन्हे दाखल करून वापरण्यात आलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सांगवी पोलीस ठाणे 9, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे 5, एमआयडीसी भोसरी ठाणे 2, शिरगाव- परंदवडी पोलीस ठाणे 2 , तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे एक, बावधन पोलीस ठाणे एक असे वीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"