Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
पिंपरी-चिंचवड

सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचा सभात्याग!

सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचा सभात्याग!

नियमांची पायमल्ली , न्यायालयात जाणार ; बहल
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची आज आयोजित करण्यात आलेली सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने सभात्याग केला. नगरसेवक योगेश बहल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर पडत प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. या सभेतील निर्णयांविरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही बहल यांनी दिला.

viara vcc
viara vcc

लोकांच्या हिताच्या विषयांमध्ये आम्ही तुमच्यासोबत आहोत. मात्र, जिथे नियमांची पायमल्ली होत आहे, तिथे आम्ही पाठिंबा देणार नाही असा स्पष्ट इशारा योगेश बहल यांनी दिला. अधिसूचनेनुसार सभेसाठी सात दिवसांची नोटीस देणे आवश्यक आहे. २७ ऑगस्टला अजेंडा काढण्यात आला, तो २८ ऑगस्टला वेबसाईटवर प्रसिद्ध झाला आणि वर्तमानपत्रातही २८ ऑगस्टलाच प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे आजपर्यंत सात दिवस पूर्ण झालेले नाहीत. आज केवळ सहा दिवस झाले असून, त्यामुळे आजची सभा बेकायदेशीर आहे असे ते म्हणाले.

अजेंड्यावरील सर्व विषय १७ सप्टेंबरच्या नियमित सभेत घेणे अपेक्षित होते. ते विषय २ सप्टेंबरच्या सभेत घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? ही सभा शुक्रवारी का घेण्यात आली नाही? आम्ही न्यायालयात जाणार आहोत. नियमित सभेत केवळ तीन विषय घ्यावेत. प्रशासनाने दिलेला खुलासा अयोग्य आहे , १७ सप्टेंबरपर्यंत थांबा; मात्र चुकीच्या गोष्टीला आमचा पाठिंबा नाही,” असेही बहल म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले, “आमचा सभा उधळण्याचा कोणताही डाव नाही. मात्र, नियमांचे पालन झाले पाहिजे. महापालिका प्रशासनाने नियमांनुसार काम करणे अपेक्षित आहे.

शिवसेनेचे गटनेते विश्वजीत बारणे यांनीही सभेच्या वैधतेबाबत प्रश्न उपस्थित केला. “ही सभा अधिकृत असेल, तर आमचा पाठिंबा आहे. शहरातील विकासकामांचे निर्णय महत्त्वाचे आहेत. मात्र, ही प्रक्रिया नियमात बसत नसेल, तर आमचा पाठिंबा राहणार नाही, असे स्पष्ट केले.

यावर स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी स्थायी समितीच्या विषयांबाबत भूमिका मांडली. ते म्हणाले, “स्थायी समितीचे विषय नजीकच्या सभेत घेता येतात. शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत.

भाजपचे नगरसेवक विनोद नढे यांनी मात्र ही सभा पूर्णपणे वैध असल्याचा दावा केला. विषयांवर हरकत घेऊन विकासकामांना अडथळा आणू नये. अधिनियमातील सर्व तरतुदींमध्ये आजचे विषय बसतात. या संदर्भात उच्च न्यायालयाचा दाखलाही आहे. त्यामुळे सभा वैध आहे,” असे नढे यांनी सांगितले.

महापालिका प्रशासनानेही सभेच्या वैधतेबाबत स्पष्टीकरण दिले. महापालिका अधिनियमात तातडीची सभा घेण्याची तरतूद असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. नियमित मासिक सभेतील विषयांसह २० ऑगस्टच्या सभेतील विषयांवर या विशेष सभेत निर्णय घेता येऊ शकतो. त्यामुळे आजची सभा वैध असल्याची भूमिका प्रशासनाने मांडली.

सभेच्या कायदेशीर वैधतेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद झाल्याने महापालिकेतील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सभात्याग करत न्यायालयात जाण्याची तयारी दर्शविल्याने या सभेतील निर्णयांच्या वैधतेचा प्रश्न पुढील काळातही चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"