Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

2nd November 2026
महाराष्ट्र

धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी पाच कोटींचा निधी!

धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी पाच कोटींचा निधी!

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील ऐतिहासिक धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी तसेच गडाच्या जतन व दुरुस्तीच्या कामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने यास प्रशासकीय मान्यता दिली. यामुळे धर्मवीर गडाच्या संवर्धनाच्या कामाला गती मिळणार आहे.

viara vcc
viara vcc

सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरातत्त्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाने जारी केलेल्या आदेशानुसार जिल्हा नियोजन समिती (नाशिक) अंतर्गत प्राचीन स्मारकांच्या जतन व दुरुस्तीच्या कामासाठी उपलब्ध निधीतून पेडगाव येथील धर्मवीर गड कामाचा समावेश करण्यात येऊन प्रशासकीय मान्यता देण्यात आली. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. धर्मवीर गडाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन गडाचे संवर्धन जतन आणि विकास व्हावा तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतींना साजेसे स्मारक उभारले जावे यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी पाठपुरावा केला होता.

धर्मवीर गड छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी अतूट नाते सांगणारा ऐतिहासिक वारसा आहे. संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांना पकडल्यानंतर पेडगावच्या याच गडावर आणण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या शौर्य, स्वाभिमान आणि बलिदानाच्या स्मृतीशी जोडलेल्या या भूमीचे जतन करणे ही ऐतिहासिक जबाबदारी आहे. धर्मवीर गडाच्या विकासासाठी आराखडा तयार केला जाणार असून गडाला ऐतिहासिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"