फक्त मुद्द्याचं!

24th April 2026
पिंपरी-चिंचवड

नायर ईगल्स्‌‍ संघ अंतिम फेरीत; ऐश्वर्यम चॅलेंजर्स, बन्ट्स वॉरीयर्स संघ उपांत्य फेरीत!

नायर ईगल्स्‌‍ संघ अंतिम फेरीत; ऐश्वर्यम चॅलेंजर्स, बन्ट्स वॉरीयर्स संघ उपांत्य फेरीत!

पहिली ‌‘पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग‌’ महिलांची टी-२० क्रिकेट स्पर्धा
नायर ईगल्स्‌‍ संघाची सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूः इशा घुले
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने पहिल्या ‌‘पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग‌’ (पीसीपीएल) महिलांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत नायर ईगल्स्‌‍ संघाने अव्वल स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. ऐश्वर्यम चॅलेंजर्स आणि बन्ट्स वॉरीयर्स गुणतक्त्यामध्ये अनुक्रमे व्दितीय आणि तृतीय स्थान मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

viara vcc
viara vcc

नायर ईगल्स्‌‍ संघाचा संघाचा २१ धावांनी विजय
हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत इशा घुले हिने फटकावलेल्या शतकी खेळीच्या जोरावर नायर ईगल्स्‌‍ संघाने ऐश्वर्यम चॅलेंजर्स संघाचा २१ धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना नायर ईगल्स्‌‍ संघाने २० षटकात ३ गडी गमावून बाद १६७ धावांचे लक्ष्य उभे केले. जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या इशा घुले हिने ४७ चेंडूत ११ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद १०० धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजुने सृष्टी सुर्यवंशी हिने ४४ धावांचे योगदान दिले. या आव्हानामोर ऐश्वर्यम चॅलेंजर्स संघाचा डाव १४६ धावांवर मर्यादित राहीला. जान्हवी पोळ (३९ धावा) आणि शर्वरी किल्लारी (१९ धावा) यांनी प्रतिकार केला. जान्हवी बोकडे हिने २४ धावांत ४ गडी तर, इशा घुले हिने दोन गडी बाद करून संघाचा विजय साध्य केला.

बन्ट्स वॉरीयर्स संघाचा ३ गडी राखून विजय
रूची दहीफळे हिने केलेल्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर बन्ट्स वॉरीयर्स संघाने ऑक्सिरीच संघाचा ३ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना ऑक्सिरीच संघाने १३८ धावा धावफलकावर लावल्या. स्वांजली मुळे हिने ५४ चेंडूत ९ चौकारांसह नाबाद ७० धावांची खेळी केली. यशस्वी वाघमारे हिने २४ धावा जोडल्या. हे लक्ष्य बन्ट्स वॉरीयर्सने १८.४ षटकात व ७ गडी गमावून पूर्ण केले. अर्णवी शिंदे (नाबाद ४९ धावा), अमानी नंदाल (२५ धावा आणि रूची दहीफळे (१९ धावा) यांनी धावा जमवून संघाचा विजय सोपा केला.

सामन्यांचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
ऑक्सिरीचः २० षटकात ४ गडी बाद १३८ धावा (स्वांजली मुळे नाबाद ७० (५४, ९ चौकार, यशस्वी वाघमारे २४, रूची दहीफळ १-१८) पराभूत वि.
बन्ट्स वॉरीयर्सः १८.४ षटकात ७ गडी बाद १३९ धावा (अर्णवी शिंदे नाबाद ४९ (३७, ७ चौकार, अमानी नंदाल २५, रूची दहीफळे १९, आर्या झेंडे ३-२०); सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूः रूची दहीफळे; फायटर ऑफ द मॅचः स्वांजली मुळे;

नायर ईगल्स्‌ : २० षटकात ३ गडी बाद १६७ धावा (इशा घुले नाबाद १०० (४७, ११ चौकार, ५ षटकार), सृष्टी सुर्यवंशी ४४, अस्मिता अमोल १-१७) वि.वि.
ऐश्वर्यम चॅलेंजर्सः २० षटकात ९ गडी बाद १४६ धावा (जान्हवी पोळ ३९, शर्वरी किल्लारी १९, जान्हवी बोकडे ४-२४, इशा घुले २-१९); सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूः इशा घुले; फायटर ऑफ द मॅचः जान्हवी पोळ.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"