Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
कला साहित्य

संगीत हा आपला प्रसन्न करणारा प्रवास : पं. नयन घोष!

संगीत हा आपला प्रसन्न करणारा प्रवास : पं. नयन घोष!

पिंपरी चिंचवड सोशल क्लब आणि क्वालिटी डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरसागर संगीत महोत्सव संपन्न
पिंपरी . संगीत हा आपला प्रसन्न करणारा प्रवास असून आपण ते ऐकत रहावे, त्यांनी स्वरसागरातच्या पदाधिकारी, संयोजक यांचे कौतुक करून स्वरसागर पुरस्कार, मोमेंटो, २५,०००/- रुपये, शाल, श्रीफळ व मानपत्र अर्पण करण्यात आले.हा पुरस्कार दिल्याबद्दल पं. नयन घोष यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड सोशल क्लब आणि क्वालिटी डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे दिनांक २७ व २८ जुलै २०२७ रोजी २७व्या स्वरसागर संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक २७ जुलै रोजी सायंकाळी या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा आणि स्वरसागर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर सौ. उमा खापरे, आमदार, विधान परिषद, प्रवीण तुपे, मुख्य संयोजक, अनिल गालींदे, डॉ. रवीन्द्र घांगुर्डे, सावनी घांगुर्डे, प्रसिद्ध गायिका, विदुषी सानिया पाटणकर, क्वालिटी डेव्हलपर्सचे संकेत तुपे, हंबीर आवटे, तानाजी थिगळे, मल्लाप्पा कस्तुरे, निवेदक अभिजीत कोळपे, जवाहर कोटवानी, राकेश श्रीवास्तव, जयदीप खापरे, शिरीष कुंभार, सुरेखा कुलकर्णी, अस्मिता सावंत, गजानन चिंचवडे, मोहन लोंढे, मृगेश नटराजन, राजीव तांबे, संजय कांबळे त्याचप्रमाणे स्वरसागर पुरस्कार प्राप्त विख्यात तबला आणि सतार वादक पंडित नयन घोष पत्रकार आणि रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वरसागर महोत्सवाची सुरुवात नुपूर नृत्यालय प्रस्तुत नृत्यगाथा या कथक नृत्याच्या कार्यक्रमाने झाली. भक्ती, शक्ती, संस्कृती यावर आधारित या कार्यक्रमाची सुरुवात नुपूर नृत्यालय च्या संचालिका डॉ. सुमेधा गाडेकर यांच्या देवी स्तुती ने झाली, त्यानंतर शिष्यसमवेत त्यांनी ताल पंचम सावरी सादर केला. आधुनिकता व परंपरा यांचा संगम साधणारा तराना फ्युजन ही नृत्यप्रस्तुती झाली. गणेश पंचायतन, शिवाजी महाराज – शाहिस्तेखान भेटीचा प्रसंग नृत्यनाटिकेतून सादर झाला. सांगता पांडुरंगा विठ्ठला – श्रीरंगा विठ्ठला या गाण्याने झाली. प्रेक्षकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांचा ठेका धरला. सूत्रसंचालन मंजिरी भाके यांनी केले.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. महोत्सवाचे मुख्य संयोजक प्रवीण तुपे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी स्वरसागरची सुरुवातस महोत्सवात देण्यात येणारे पुरस्कार आणि शहराच्या सांस्कृतिक चळवळीत या महोत्सवाचे योगदान, रसिकांचा प्रतिसाद आणि सद्यस्थितीत या महोत्सवाचे नियोजन, कार्यक्रमांची माहिती याबाबत सविस्तर माहिती दिली. रसिक प्रेक्षकांनी हा महोत्सव मनपाच्यानंतर देखील सुरू ठेवला आहे, यावर टाळ्यांच्या गजरात रसिकांनी प्रतिसाद दिला. प्रास्ताविकानंतर पंडित नयन घोष यांचे कार्य विषद करणारे मानपत्र वाचन संजय कांबळे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते पं. नयन घोष यांना स्वरसागर पुरस्कार, मोमेंटो, २५,०००/- रुपये, शाल, श्रीफळ व मानपत्र अर्पण करण्यात आले.

त्यानंतर पं. नयन घोष यांनी आपल्या मनोगतात आपले गुरुवर्य वडील पं. निखिल घोष (ज्येष्ठ तबला वादक) ज्यांना पद्मभूषण सन्मान मिळाला असून, त्यांच्या अभूतपूर्व कार्याचा आढावा घेतला. तसेच विख्यात बासरी वादक पन्नालाल घोष, जे त्यांचे पुतणे आहेत त्यांच्या कारकिर्दीची माहिती दिली. त्यांनी जगभरात आणि भारताच्या कानाकोपऱ्यात सांगितिक कार्यक्रम केल्याचे सांगितले.

उमा खापरे, आमदार यांनी आभार प्रदर्शनात पंडित नयन घोष आणि श्री प्रवीण तुपे यांच्या कार्याचा हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत उत्स्फूर्तरित्या आपले प्रभावी भाषेत मनोगत व्यक्त केले. पं. नयन घोष यांचा सत्कार हा शहरासाठी भूषणावह असून त्यांची उपस्थिती आणि मनोगताने आम्ही भारावून गेल्याचे सांगितले. श्री प्रवीण तुपे हा महोत्सव दरवर्षी स्वखर्चाने करतात, हा महोत्सव त्यांच्यामुळेच बंद पडला नसून, तो सुरू राहिला आहे, त्यांचे या शहराच्या सांस्कृतिक चळवळीत त्यांच्या सहकार्यासह महत्त्वाचे योगदान असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. त्यांच्या मनोगतस प्रचंड प्रतिसाद रसिकांनी दिला. मानपत्राचे वाचन संजय कांबळे यांनी केले आणि अभिजीत कोळपे यांनी सूत्रसंचालन केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"