फक्त मुद्द्याचं!

31st May 2026
पिंपरी-चिंचवड

घनकचरा नियमांचे पालन न करणाऱ्या सोसायट्यावर महापालिका करणार दंडात्मक कारवाई!

घनकचरा नियमांचे पालन न करणाऱ्या सोसायट्यावर महापालिका करणार दंडात्मक कारवाई!

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ओल्या कचऱ्याची स्थानिक पातळीवर प्रक्रिया बंधनकारक
नियमभंगास दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा
पिंपरी : शहरातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या, हॉटेल्स, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक आस्थापनांनी घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ चे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर महापालिकेकडून दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिला आहे.

viara vcc
viara vcc

केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ अंतर्गत मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था अर्थात ‘बल्क वेस्ट जनरेटर्स’वर अतिरिक्त जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. दररोज १०० किलो किंवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या, २० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या किंवा दररोज ४० हजार लिटरपेक्षा अधिक पाणी वापरणाऱ्या आस्थापनांचा या वर्गात समावेश होतो.

या संस्थांनी आपल्या परिसरातच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे, ‘एक्स्टेण्डेड बल्क वेस्ट जनरेटर रिस्पॉन्सिबिलिटी’ अंतर्गत आवश्यक कार्यवाही करणे, केंद्रीकृत पोर्टलवर नोंदणी करणे तसेच कचरा व्यवस्थापनाची नियमित नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या आणि आस्थापनांनी ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन त्यांच्या स्तरावरच करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून संबंधित संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्याबाबतची माहिती वर्तमानपत्रांमधूनही प्रसिद्ध करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळणे सर्व संबंधित संस्थांसाठी बंधनकारक असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

नियमांचे पालन न करणाऱ्या संस्था आणि आस्थापनांवर प्रथम स्तरावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, सातत्याने उल्लंघन आढळल्यास पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत फौजदारी कारवाईचीही तरतूद असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत पिंपरी चिंचवड शहर अग्रेसर राहावे, यासाठी सर्व संबंधितांनी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

घनकचरा व्यवस्थापन नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शहरातील सर्व मोठ्या कचरा निर्मिती संस्थांनी निर्धारित प्रक्रियेचे पालन करून आवश्यक नोंदणी व कचरा प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे<span class=”gmail-NormalTextRun gmail-SCXW30152347 gmail-BCX0″ style=”m

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"