फक्त मुद्द्याचं!

23rd June 2026
मुंबई

भारतातील पहिले आदिवासी कला-कौशल्य-कारागिरीचे केंद्र पिंपरी-चिंचवडमध्ये!

भारतातील पहिले आदिवासी कला-कौशल्य-कारागिरीचे केंद्र पिंपरी-चिंचवडमध्ये!

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन
मुंबई : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी क्रांतिवीर चापेकर बंधूंची भूमि पिंपरी-चिंचवडमध्ये आदिवासी व वंचित घटकांतील मुलांसाठी समर्पित कला-कौशल्य-कारागिरीचे केंद्र उभारण्याचा संकल्प आता दृष्टीक्षेपात आला आहे. शहराचे भूषण आणि पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या संकल्पनेतील या केंद्राला जागा उपलब्ध करुन देण्याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. याबाबतचा प्रस्ताव कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात येणार आहे.

viara vcc
viara vcc

भोसरी विधानसभा मतदारसंघासह पिंपरी-चिंचवड शहरातील महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शहराच्या विकासाशी निगडित ७ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

या बैठकीला पोलीस आयुक्त. विनयकुमार चौबे, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार महेश लांडगे यांनी मांडलेल्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून, अनेक विषयांवर तातडीने कार्यवाहीचे आदेश देण्यात आले.

भारतातील आदिवासी कला-कौशल्य लूप्त होत आहेत. इंग्रजी शाळांचा प्रभाव वाढलेला असताना, भारतीय संस्कृती, सभ्यता यांचा पुरस्कार आणि प्रचार करणारे केंद्र उभारले जावे. त्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा. यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात १५ हेक्टर जागा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीने केली होती. यावर पहिल्या टप्प्यात या प्रकल्पासाठी १० हेक्टर जागा आणि दुसऱ्या टप्प्यात ५ हेक्टर जागा उपलब्ध करण्याचे विचाराधीन आहे. यामध्ये संकूलाचे बांधकाम आणि ओपन स्पेस असा भव्य प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"