कठड्याला दुचाकी धडकल्याने तरुण मित्राचा मृत्यू!

पिंपरी : भरधाव वेगाने बजाज कंपनीची आप्पाची गाडी चालवून सिमेंटच्या कठड्याला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या मित्राच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. ही घटना रविवार 21 जून रोजी रात्री 02:11 च्या सुमारास डीएलएफ सर्कल जवळील, मेट्रो स्टेशन हिंजवडी, फेज तीन येथे घडली.

या प्रकरणी हंसराज राजेंद्र गोरे पोलीस शिपाई, हिंजवडी पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दाखल केली आहे. ऋषिकेश सहदेव पोटदुखे (वय 26, सध्या रा- बी 2, फ्लॅट नंबर 306 ,कासार एक्सप्रिया सोसायटी, वाकड) असे आरोपीचे नाव आहे. अक्षय राजेंद्र कावरे (वय 23, मूळ- रा. अमरावती असे मयत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने बजाज कंपनीची आप्पाची गाडी नंबर (एम एच 14/ एम डब्ल्यू/ 0756) ही भरधाव वेगाने चालवून रोडच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या कठड्याला धडकवली. दुचाकी चलविणार्या आरोपीच्या मागे बसलेला त्याच्या मित्रास डोक्यास गंभीर दुखापत व शरीरास मार लागल्याने मित्र अक्षय कावरे याचा मृत्यू होण्यास कारणीभूत झाला. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील हे तपास करत आहेत.

