4 लाख 47 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरले!

पिंपरी : राहत्या घराची चावी विश्वासाने एका व्यक्तीकडे देऊन फिर्यादी या कोल्हापूर येथे गेल्या असताना आरोपीने फिर्यादीच्या घरातून 14 तोळे नऊ ग्रॅम वजनाचे एकूण 4 लाख 47 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना सहा ते 10 मे च्या दरम्यान शिवानंद पार्क, कालनिन 13, गणेश नगर, बोपखेल येथे घडली.

याप्रकरणी मनीषा दीपक हिरवळे (वय 38, रा. फ्लॅट नंबर 203 ,अभिनंदन पार्क ,कालनिन 13, गणेशनगर, बोपखेल) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अवतार शिंघवीर सिंघ सोहल (रा. डॉक्टर काळे यांच्या रूममध्ये भाड्याने, काळे हॉस्पिटल पाठीमागे, गणेशनगर, बोपखेल, मूळ- रा. जालंदर, पंजाब) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या कोल्हापूर येथे जाणार असल्याने त्यांच्या घरातील मांजरींना खाद्य घालावे या उद्देशाने आरोपीकडे विश्वासाने आपल्या घराची चावी दिली. आरोपीने सात मे रोजी फिर्यादीस कॉल करून शिवीगाळ केली आणि काम सोडून चार चार दिवस निघून जाते तुला दाखवतो अशी धमकी दिली. आरोपीने फिर्यादीच्या राहते घरातून 14 तोळे नऊ ग्रॅम वजनाचे एकूण चार लाख 47 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने लाकडी कपाटा मधून ड्राव्हरचे लॉक उघडून फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेले. दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहणे हे अधिक तपास करत आहेत.

