फक्त मुद्द्याचं!

11th May 2026
गुन्हेगारी

दारू पिऊन आलेल्या पतीने केली पत्नीला मारहाण!

दारू पिऊन आलेल्या पतीने केली पत्नीला मारहाण!

पिंपरी : दारू पिऊन आलेल्या पतीने शिवीगाळ केल्याने त्यांना लाईट बंद करून झोपण्यास सांगितले. त्यामुळे चिडून त्यांनी पत्नीला पट्ट्याने मारहाण करून आणि कोणत्यातरी हत्याराने गळ्यावर मारून गंभीर जखमी केले. याशिवाय मुलाला देखील मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवार 10 मे रोजी रात्री 12:30 च्या सुमारास सुमा गायकवाड बिल्डिंग, इंद्रायणी हाउसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी आरोपीच्या पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सुभाष केशव उत्तेकर (वय 45, रा. गायकवाड बिल्डिंग, रूम नंबर एक, इंद्रायणी पोलीस हाउसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहत्या घरी फिर्यादी, फिर्यादीचे पती आरोपी व मुलगा ज्ञानेश्र्वर असे तिघे घरात असताना आरोपी हे दारू पिऊन आल्याने शिवीगाळ करीत होते. त्यामुळे फिर्यादीने त्यांना घरातील लाईट बंद करून आरोपीस झोपण्यास सांगितले. आरोपीने फिर्यादीस पट्ट्याने मारहाण करून शिवीगाळ करीत फिर्यादीचे अंगावर कोणत्यातरी हत्याराने किंवा वस्तूने गळ्यावर मारून तसेच मुलगा ज्ञानेश्र्वर यांचे हनुवटीवर, खांद्यावर, गळ्यावर व हातावर वार करून गंभीर जखमी केले. चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवकर हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"