Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
पिंपरी-चिंचवड

गणेशोत्सव; रस्ते, पदपथ, स्वच्छता, विसर्जन व्यवस्थेला प्राधान्य देण्याचे निर्देश

गणेशोत्सव; रस्ते, पदपथ, स्वच्छता, विसर्जन व्यवस्थेला प्राधान्य देण्याचे निर्देश

पिंपरी, : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने विद्युत तारा व जोडण्यांची सुरक्षितता तपासून धोकादायक जोडण्यांवर संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने कार्यवाही करावी. कृत्रिम विसर्जन हौदांची तयारी, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था वेळेत पूर्ण करावी. तसेच प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याने आपला प्रभाग स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांसाठी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी. पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करावेत, सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता, झाडांची छाटणी आणि रस्त्यांची दुरुस्ती वेळेत पूर्ण करावी. बीट निरीक्षकांमार्फत अनधिकृत बांधकामांवर बारकाईने लक्ष ठेवून तातडीने निष्कासनाची कार्यवाही करावी, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आगामी गणेशोत्सव तसेच शहरातील विविध नागरी सुविधांच्या अनुषंगाने आयुक्त डॉ.सूर्यवंशी यांनी संबंधित विभागप्रमुख व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, स्वच्छता व्यवस्था, रस्ते व पदपथांची स्थिती, विद्युत सुरक्षाव्यवस्था, उद्याने, गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन हौदांची तयारी तसेच नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देताना आयुक्त बोलत होते.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, तृप्ती सांडभोर, सह आयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मनोज सेठिया, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, प्रेरणा सिनकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उपआयुक्त सचिन पवार, सीताराम बहुरे, राजेश आगळे, डॉ. प्रदीप ठेंगल, अण्णा बोदडे, व्यंकटेश दुर्वास, संदीप खोत, पंकज पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, सहाय्यक आयुक्त अमित पंडित, तानाजी नरळे, क्षेत्रीय अधिकारी यांच्यासह स्थापत्य, विद्युत, पर्यावरण आदी विभागांचे कार्यकारी अभियंता आणि कर्मचारी उपस्थित होते.

कृत्रिम विसर्जन हौदांची तयारी वेळेत पूर्ण करा
गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील कृत्रिम विसर्जन हौदांची आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करावी. विसर्जनस्थळी स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, सुरक्षा आणि नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. गणेशोत्सव काळात विविध विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

प्रभाग स्वच्छ व अतिक्रमणमुक्त ठेवण्याची जबाबदारी
आपला प्रभाग स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त ठेवणे ही प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील फुटपाथवरील अतिक्रमणे तातडीने हटवून पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळे करून द्यावेत. प्रभागातील सार्वजनिक स्वच्छतागृहे नियमितपणे स्वच्छ ठेवावीत, वेळोवेळी झाडांची छाटणी करावी तसेच रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.

नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करा
महापालिकेच्या सारथी प्रणालीवर तसेच शासनाच्या संकेतस्थळांवर नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची संबंधित विभागप्रमुखांनी तातडीने दखल घेऊन त्यांचा वेळेत निपटारा करावा. नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित राहणार नाहीत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियमितपणे तक्रारींचा आढावा घ्यावा आणि केलेल्या कार्यवाहीची नोंद ठेवावी.

लोकप्रतिनिधींच्या पत्रांना, तक्रारींना वेळेत प्रतिसाद द्या
लोकप्रतिनिधींकडून महापालिकेकडे प्राप्त होणारी पत्रे, निवेदने आणि तक्रारी यांची संबंधित विभागांनी गांभीर्याने दखल घेऊन त्यावर वेळेत कार्यवाही करावी. प्राप्त पत्रांना व तक्रारींना अनावश्यक विलंब होणार नाही, याची दक्षता घेत संबंधित लोकप्रतिनिधींना करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत वेळेत कळवावे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"