Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

3rd October 2026
गुन्हेगारी

महिलेच्या एटीएम कार्डद्वारे पैसे काढून केली फसवणूक!

महिलेच्या एटीएम कार्डद्वारे पैसे काढून केली फसवणूक!

पिंपरी : दोन व्यक्तींनी एका महिलेस एटीएम मशीन मधून पैसे काढण्यास मदत करतो असे सांगून त्यांचे एटीएम हातचलाकिने स्वतःकडे घेऊन त्या जागी आरोपीकडील एसबीआय बँकेचे एटीएम देऊन महिलेच्या एटीएम कार्ड मधून 34 हजार 500 काढून फसवणूक केली. ही घटना 23 सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास एसबीआय शांताई सिटी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ येथे घडली

viara vcc
viara vcc

या प्रकरणी मैनाबाई आनंद श्रीरामे (वय 35, रा. काका हलवाई समोर, लिटिल हार्ट सोसायटी जवळ, एस के पार्लर, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

indra dairy
indra dairy

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन व्यक्तींनी फिर्यादीच्या नावाचे एटीएम कार्ड पैसे काढण्यासाठी मदत करतो असे सांगून त्यांचे एटीएम हातचलाकीने स्वतःकडे घेऊन त्याजागी आरोपीकडील हरिलाल जयस्वाल नावाचे एसबीआय बँकेचे बनावट एटीएम फिर्यादीकडे देऊन फिर्यादीच्या एसबीआय बँकेच्या खात्यातून 34 हजार 500 एटीएम मधून काढून फसवणूक केली. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"