Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
पिंपरी-चिंचवड

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ ला उत्साहपूर्ण प्रारंभ!

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ ला उत्साहपूर्ण प्रारंभ!

उपमहापौर शर्मिला बाबर व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन; सामाजिक
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ या कार्यक्रमाचा आज भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समता, सामाजिक न्याय, श्रमप्रतिष्ठा आणि परिवर्तनवादी विचारांचा वारसा समाजापर्यंत, विशेषतः युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन उपमहापौर शर्मिला बाबर व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

viara vcc
viara vcc

खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार महेश लांडगे,शंकर जगताप, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अ प्रभाग अध्यक्षा अर्चना करांडे, नगरसदस्य अनिल घोलप,अनुराधा गोरखे, सुलभा उबाळे, सुप्रिया चांदगुडे, ऐश्वर्या तरस, निलेश तरस, मधुरा शिंदे, उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश अवघडे, जेजुरी देवस्थानाचे अध्यक्ष अनिल सौंदंडे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब अडागळे,संजय ससाणे, अरुण जोगदंड,युवराज दाखले,नितीन घोलप, प्रल्हाद सुधारे,सुनिल भिसे,रोहन भिसे,नाना कसबे,सतीश भवाळ,यादव खिलारे,विशाल कसबे,बाळासाहेब रसाळ,शिवाजी साळवे, डी.पी.खंडाळे, नेताजी शिंदे,नामदेवराव रिट्टे,भगवान शिंदे, पोपट आरणे, मारुती जाधव, नरसिंह वैरागर, सुरेश वैरागर, प्रसाद केसरे, अर्चना शिंदे, सुनिता भेंगळे, समिरा राजगुरू, अनिता जगधनेमहिला अध्यक्षा उषाताई कांबळे, कल्पना मोरे-दाखले,अनिशा पवार, संगिता नानेकर, गीता अडागळे, आशा शहाणे, मीना खिलारे, संदीप रोखडे, गणपत जाधव, अरुणा भोसले, तेजस्विनी भोसले, किर्ती जाधव, वंदना जाधव, सचिन लिमकर, विलास गडसिंग, संतोष जाधव, अनंत कुलकर्णी, सतीश रिट्टे तसेच विविध सामाजिक संस्था, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दि. १ ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे आयोजित या महोत्सवात सामाजिक प्रबोधनपर व्याख्याने, वैचारिक परिसंवाद, साहित्यिक कार्यक्रम, कवी संमेलन, लोककला सादरीकरणे, संगीत मैफिली, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सनईवादन, पारंपरिक हलगीवादन, बँड स्पर्धा,स्वरचंदन’ गीतगायन, ‘महाराष्ट्राची लोकसंस्कृती’ या सांस्कृतिक कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या सात दिवसांच्या महोत्सवात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, साहित्यिक, विचारवंत, कलावंत आणि लोककलावंत सहभागी होणार असून, सामाजिक प्रबोधनासोबतच महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अनुभवण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. महोत्सवातील सर्व कार्यक्रमांसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"