Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामधील आठ पोलीस अधिकारी आणि अंमलदार सेवानिवृत्त!

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामधील आठ पोलीस अधिकारी आणि अंमलदार सेवानिवृत्त!

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामधील आठ पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे 31 जुलै 2026 रोजी निवृत्त झाले. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यावतीने या सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांचा सन्मान व निरोप समारंभ पोलीस आयुक्तालय येथील ‘शिवनेरी हॉल’मध्ये करण्यात आला.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आस्थापनेवरील नियमित वयोमानाने सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व अंमलदारांमध्ये अमोल यशवंत धायगुडे (पोलीस उपनिरीक्षक), सिताराम सखाराम केवळ (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक), बबन गणपत विरनक (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक), दिनेश रामराव ढवळे (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक), श्रीमती लता बळीशा अंबरगी (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक), श्रीमती हेमा एकनाथ भवारी (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक), केशव सहादू शेळके (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक), महादेव गोरख सुरवशे (पोलीस शिपाई )यांचा समावेश आहे.

सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व अंमलदार यांचा त्यांचे कुटुंबीयसह शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ ,सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, स्मृतीचिन्ह, झाडाचे रोपटे व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना पुढील आयुष्य व आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या सन्मान कार्यक्रमास पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे सारंग आवाड, अप्पर पोलीस आयुक्त प्रादेशिक विभाग बसवराज तेली, पोलीस उपायुक्त विशेष शाखा धीरज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नरावाड, सहा सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश भामरे हे उपस्थित होते,

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"