Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

27th October 2026
पिंपरी-चिंचवड

ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोमर्यादा सत्तरीपुढे करण्याचा विचार व्हावा : न्यायमूर्ती अभय ओक

ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोमर्यादा सत्तरीपुढे करण्याचा विचार व्हावा : न्यायमूर्ती अभय ओक

यशवंतराव चव्हाण जेष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार श्री. मानव कांबळे यांना प्रदान
मुंबई, : विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे आयुर्मान वाढले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठीची वयोमर्यादा सत्तरीच्या पुढे करण्याचा विचार करायला हवा, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले.

viara vcc
viara vcc

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून आयोजित ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान सोहळा व आनंद मेळावा’ यावेळी संपन्न झाला. या कार्यक्रमास न्यायमूर्ती अभय ओक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

indra dairy
indra dairy

साठाव्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर आपण मानसिकदृष्ट्या ज्येष्ठ झालो असून सार्वजनिक जीवनातूनही निवृत्त झालो आहोत, असा न्यूनगंड ज्येष्ठांनी बाळगू नये. साठीनंतरची ‘तिसरी इनिंग’ ही देशकार्य, समाजकार्य आणि सर्जनशील कार्यासाठी द्यावी, असे आवाहन न्यायमूर्ती ओक यांनी केले. ज्येष्ठ नागरिकांकडे असलेला अनुभव, ज्ञान आणि कौशल्य समाजाच्या विकासासाठी महत्त्वाचे असून त्याचा उपयोग पुढील पिढीच्या घडणीत व्हावा, असेही त्यांनी सांगितले. पर्यावरण बदलाचे गांभीर्य लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही न्यायमूर्ती ओक यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात यशवंतराव चव्हाण सेंटरचे उपाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी पिढ्यांमधील वाढते अंतर म्हणजेच ‘जनरेशन गॅप’ कमी करण्यासाठी दोन्ही पिढ्यांनी परस्परांना समजून घेण्याची गरज व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिकांनी केवळ ज्येष्ठांच्याच सहवासात न राहता तरुणांसोबतही मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करावेत. तरुणांनीही ज्येष्ठांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा आदर करावा. अशा संवादातून पिढ्यांमधील दरी कमी होऊन समावेशक समाजाकडे वाटचाल करता येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रकाश घादगिने लातूर, बबन पाटणकर ठाणे, भागीरथी बच्चेवार नांदेड, वृषाली मगदूम रायगड, मानव कांबळे पुणे , जनसेवा फौंडेशन,पुणे आणि ज्येष्ठ नागरिक संघ चोपडा, जळगाव यांचा ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान’ देऊन गौरव करण्यात आला.. प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. अनिल व्यंकटाचारी यांनी पार्किन्सन्स आजाराची लक्षणे, त्यावरील नियंत्रण आणि ज्येष्ठांनी आरोग्यपूर्ण जीवनशैलीच्या माध्यमातून दीर्घकाळ सक्रिय जीवन जगण्याबाबत मार्गदर्शन केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"