Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

25th October 2026
गुन्हेगारी

भरधाव टेम्पो सोसायटीच्या कॉलमला धडकल्याने तरुणाचा मृत्यू!

भरधाव टेम्पो सोसायटीच्या कॉलमला धडकल्याने तरुणाचा मृत्यू!

पिंपरी : टेम्पो वाहनाच्या टपावर बसलेला तरुण सोसायटीच्या अंडरपासचे वरील कॉलमला धडकल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार सहा ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास सोलीटायर सोसायटी, वाकड येथे घडली. ऋषी धनंजय कुदळे (वय 20) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी धनंजय श्रीनिवास कुदळे (वय 50, रा. महादेव कॉलनी, शंकर मंदिराजवळ, लक्ष्मीनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टेम्पो चालक तुषार ज्योतीराम माने (वय 22, आदर्श कॉलनी, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

indra dairy
indra dairy

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी माने याने त्याच्या ताब्यातील टाटा टेम्पो टपावर (वाहन क्रमांक एमएच 14/ एलबी/ 45 98) ऋषी धनंजय कुदळे हा बसलेला असल्याची माहिती असताना देखील टेम्पो सोनीटायर सोसायटी, पिंक रोड ,वाकड येथील अंडरपास मधून वाहन घेऊन जात असताना त्याचे जीवितास धोका होईल हे माहीत असताना टेम्पो चालकाने वाहन निष्काळजीपणाने व भरधाव वेगाने चालविल्याने टेम्पो अंडरपाचे वरील कॉलमला धडकला. यामुळे ऋषी कुदळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला. वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक घुगे पोलीस उपनिरीक्षक शिरसाट हे तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"