फक्त मुद्द्याचं!

28th April 2026
पिंपरी-चिंचवड

शहरातील प्रकल्प पूर्ण करून नागरिकांना मूलभूत सुविधा द्याव्यात : राज्यमंत्री माधुरी मिसाळ

शहरातील प्रकल्प पूर्ण करून नागरिकांना मूलभूत सुविधा द्याव्यात : राज्यमंत्री माधुरी मिसाळ

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचा घेतला सविस्तर आढावा
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराच्या विकासकामांमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करून नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून द्याव्यात तसेच महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर परिवहन महामंडळ यांनी विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून शहरातील विकास कामांचा वेग वाढविण्याचे आणि प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याच्या नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात राज्याच्या नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी शहरातील विविध महत्त्वाच्या विकासकामांची आढावा बैठक घेतली. यावेळी राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या.

बैठकीच्या प्रारंभी महापौर रवि लांडगे यांनी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे स्वागत केले, यावेळी विधान परिषद सदस्य उमा खापरे,अमित गोरखे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शहर सुधार समितीचे सभापती संजय काटे, नगर सदस्य कुणाल वाव्हळकर, धर्मराज तंतरपाळे आदी उपस्थित होते.

तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, उपसंचालक नगररचना किशोर गोखले, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, स्मार्ट सिटीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, सह शहर अभियंता बापू गायकवाड, सुनिल भगवानी, प्रेरणा सिनकर, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सचिन पवार, अण्णा बोदडे, संदीप खोत, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीच्या सुरुवातीस आयुक्त डॅा.विजय सूर्यवंशी यांनी संगणकीय सादरीकरणातून शहरात सुरु असलेले पाणी पुरवठा प्रकल्प, अमृत योजना २. ०, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, रस्ते विकास प्रकल्प, शहरातील ड्रेनेज व पायाभूत सुविधा सुधार प्रकल्प, मेट्रो वाहतूक प्रकल्प, रस्ते विकास प्रकल्प प्रधानमंत्री आवास योजना, हुतात्मा क्रांतिवीर चापेकर वाडा, अग्निशमन केंद्र, नोकरदार महिला वसतिगृह, संतपीठ प्रकल्प, मनोरंजन प्रकल्प, नदी सुधार प्रकल्प, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता तसेच विविध नागरी प्रकल्पाची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना दिली.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी प्रत्येक प्रकल्पाची सध्यस्थिती, कामांचा प्रगतीदर, निधीचे वितरण, कामातील तांत्रिक अडचणी आणि त्यावरील उपाययोजना यांचा सखोल आढावा घेतला. शहरातील वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण प्रकल्प आणि मनोरंजन प्रकल्पांच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास साधण्यावरही मार्गदर्शन करून सार्वजनिक ठिकाणे, उद्याने आणि नागरिकांसाठी उपलब्ध सुविधा अधिक दर्जेदार करण्यासाठी कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांचा आढावा घेताना लाभार्थ्यांना वेळेत घरे उपलब्ध करून देण्याबाबत काटेकोर नियोजन करावे तसेच रस्ते विकास आणि वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा करून नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी आमदार महेश लांडगे बोलताना म्हणाले की, शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या उगम स्थान ते देहू गावापर्यंत एस टी पी लागू करावा अशावेळी महानगरपालिका देखील एसटीपीचा वापर करून पाणी नदीत सोडेल संपूर्ण इंद्रायणी नदी स्वच्छ होईल. तसेच घरकुल येथील सदनिका प्रकल्प २० वर्षांपासून पूर्ण झालेला नाही. तेथे ड्रेनेज लाईन व पाण्याच्या सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे सदनिका धारकांनाचा आतापर्यंतचा कर महानगरपालिकेने माफ करावा तसा ठराव महानगरपालिकेने मंजूर करावा असे देखील आमदार लांडगे म्हणाले.

आमदार शंकर जगताप म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो प्रकल्पाला चालना देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. शहरातील रेड झोन पॉलिसी कार्यान्वित करावी तसेच शहरांच्या भविष्यातील पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी पवना नदीतून थेट पाईप लाईनने पाणी आणण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा असे देखील ते म्हणाले.

शहरातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहेत, परंतु त्यांना मूलभूत सुविधा योग्य पध्दतीने देण्यात याव्यात असे आमदार अमित गोरखे म्हणाले तर आमदार उमा खापरे यांनी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी विशेष निधी देण्याची मागणी केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"