फक्त मुद्द्याचं!

5th April 2026
पिंपरी-चिंचवड

ऑनलाईन मालमत्ता कर भरण्यास मोठी पसंती; ६९७ कोटींचा ऑनलाईन भरणा

ऑनलाईन मालमत्ता कर भरण्यास मोठी पसंती; ६९७ कोटींचा ऑनलाईन भरणा

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या सुलभ, तंत्रज्ञानाधारित उपक्रमांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाईन माध्यमाला मोठी पसंती मिळत असल्याची माहिती उपायुक्त सचिन पवार यांनी यावेळी दिली.

viara vcc
viara vcc

गेल्या आर्थिक वर्षात, १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत एकूण ७ लाख ८७ हजार १८४ मालमत्ताधारकांपैकी ६ लाख ३१ हजार ६१५ मालमत्ताधारकांनी ९६१.७४ कोटी रुपयांचा मालमत्ता कर भरला आहे. यापैकी ५ लाख ११ हजार ६०३ मालमत्ताधारकांनी तब्बल ६९७.१९ कोटी रुपयांचा कर ऑनलाईन माध्यमातून भरत डिजिटल सुविधेचा वापर केला.

महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपायुक्त सचिन पवार यांच्या अधिपत्याखाली ‘ऑनलाईन कर भरा’ मोहिमेअंतर्गत सवलती, एसएमएस सूचना, सोशल मीडिया मोहिमा तसेच सार्वजनिक घोषणांद्वारे व्यापक जनजागृती करण्यात आली. या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम म्हणून नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याऐवजी घरबसल्या ऑनलाईन कर भरण्यास प्राधान्य दिले आहे.

महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांना मालमत्तेची माहिती, थकबाकी, सवलतींचा तपशील तसेच कर भरण्याची पावती डाउनलोड करण्याची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करत असून, ऑनलाईन पेमेंट प्रणालीमुळे कर भरणे अधिक सुलभ झाले आहे.

कर भरणा
ऑनलाईन : ६९७.१९ कोटी (७२.४९%) , चेक : ११९.१३ कोटी (१२.३९%), रोख : १०४.८७ कोटी (१०.९०%) , डीडी : ७.०९ कोटी (०.७४%), समायोजन : ३३.३८ कोटी (३.४७ %), ईडीसी : ०.०६ कोटी (०.०१%),

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कर भरणा प्रक्रियेत सुलभता आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांना प्राधान्य दिले आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन माध्यमाचा स्वीकार केल्यामुळे घरबसल्या अधिक जलद पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने वेळ व श्रमांची बचत होत आहे. — सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"